18.3 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

तिसगाव खुनाच्या गुन्ह्यात तीन आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी: या बाबत सविस्तर वृत्त असे

दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी प्रवरा नदीत मिळालेल्या कल्याण देविदास मरकड रा. तिसगाव तालुका पाथर्डी याच्या मृतदेहाच्या अनुषंगाने त्याचा चुलत भाऊ प्रसाद भास्कर मरकड याच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे नेवासा येथे दि. 05/11/2024 रोजी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर खुनाच्या गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काल मध्यरात्री आरोपी नामे 1. पंकज राजेंद्र नगर वय 35 वर्ष रा. माधवनगर तिसगाव 2. अमोल गोरक्ष गारुडकर वय 33 वर्ष रा. तिसगाव 3. इर्शाद जब्बार शेख वय 38 वर्ष रा. सोमठाणे रोड तिसगाव यांना शिताफीने पकडून पोलीस ठाणे नेवासा येथे हजर केल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपींना आज रोजी मा. न्यायालयाच्या समोर हजर केले असता मा. न्यायालयाने 7 दिवस म्हणजेच दिनांक 12 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड दिलेला आहे.

 

सदर तपास दरम्यान खुनाच्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात येणार असून या खुनाच्या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा दाट संशय असल्याने सखोल तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव पोलीस ठाणे नेवासा यांनी सांगितले.”

घटनेच्या ठळक बाबी

⭕ शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी मृतक व आरोपी हे रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मिरी रोडवर असलेल्या बेंद्रे यांच्या भारत पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत अंतर्गत रोडवर दारू पीत बसलेले असताना मयत व पंकज बांगर यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. सदर बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत होऊन पंकज मगर याने त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्यामधून कल्याण मरकड यास कपाळावर गोळी मारली त्यात तो मयत झाला असल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येते.

⭕ खून केल्या नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पंकज मगर, इरशाद शेख व अमोल गारुडकर यांनी मिळुन सदरचा मृतदेह तसेच मयताची चप्पल व मोबाईल असे एका गोणीत भरुन ती गोणी पांढऱ्या रंगाच्या ब्रिझा कार मधुन प्रवरा संगम येथील ब्रिजवरुन प्रवरा नदीच्या पाण्यात खाली टाकुन दिली असल्याचे सांगीतले.

⭕ पंकज मगर याने सांगीतले की, सदर गुन्हयात वापरलेला कट्टा हा सचिन रणसिंग रा. दत्ताचे शिंगवे, ता. पाथर्डी याने पुरविला आहे.

तपासामध्ये सदरचा कट्टा कोठून खरेदी केला ? कोणी आणून दिला ? या व्यवसायात कोण कोण गुंतलेले आहे ? आणखी कट्टे कोणी कोणी खरेदी केले आहेत याबाबतचा सखोल तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव, नेवासा पोलीस ठाणे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या