दै नगरशाही
प्रतिनिधी मोहन शेगर सोनई
सोनई: नेवासा तालुक्यातील घोडेगावचे भूमिपुत्र सिनेअभिनेते भारत फुलमाळी यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्म ऑर्गनायझेशनच्यावतीने दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दगदर्शक सुनील दर्शन, खासदार गोपाल शेट्टी, कामगार नेते अभिजित राणे उपस्थित होते.
भारत यलप्पा फुलमाळी यांना आधारवड या चित्रपटात तृतीयपंथीयाची भूमिका अतिशय उत्कृष्ठ निभावल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे. सामान्य कुटुंबातून येणारे भारत यांना सिनेक्षेत्रातील कुठलीही पार्श्वभूमी
नसताना, अभिनयाच्या बळावर त्यांनी मोठी उंची गाठली आहे, प्रसिद्ध दिग्दर्शक सुरेश शंकर झाडे यांनी त्यांच्यातील कलागुण पाहून त्यांना आशीर्वाद दिला व त्यातूनच भारत फुलमाळी यांचे मोठे नाव सिनेक्षेत्रात झाले आहे. प्लेड्ज द प्रोटेक्ट या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका प्रभावी ठरली. माणूस एक माती, त्रिकोणाची चौथी
बाजू, माझी काय चूक, गणवेश
या चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. सध्या ते तेलगू व हिंदी चित्रपटात काम करत असून लवकरच हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सिद्धार्थ जाधव, गोविंद नामदेव, मुस्ताक खान, राखी सावंत, गणेश यादव यांसह अनेक कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे.