25.5 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

नेवासात आमदार शंकरराव गडाख यांचा उमेदवारी अर्ज दाखल.


नेवासात हजारो कार्यकर्ताची रॅली.

सोनई-संदिप दरंदले-नेवासा तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेची मशाल घराघरात पोहचविण्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. नेवासात राधाकृष्ण मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख बोलत होते. यावेळी आमदार गडाख यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत हजारो कार्यकर्तासह अर्ज नेवासा तहसील कार्यालय मध्ये दाखल केला.यावेळी सोबत शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे हजर होते.

यापूर्वी कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून जेष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख म्हणाले,मागील निवडणुकीत शंकरराव गडाख एकटे होते. आता या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांची शक्ती आहे. आमदार म्हणून शंकरराव गडाख यांनी केलेली कामे आपल्यासमोर आहेत. मतदारसंघात भरीव काम त्यांनी केले. मात्र, काम करत असतांना त्यांच्यासमोर विरोधकांनी अडचणी आणल्या. संस्था अडचणीत आणतानाच माझ्यासह कुटुंबावर गुन्हे दाखल करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. सार्वजनिक कामात आणि व्यक्तीगत जिवनातून उठवून टाकण्याची सुपारी घेणाऱ्या व खोडा घालणाऱ्या या मंडळींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शंकरराव गडाख यांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा असे आवाहन ज्येष्ठ नेते व साहित्यीक माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केले.
नेवासा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार राज्याचे माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसैनिकांसह तालुक्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडाख साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा यावेळी गडाख समर्थकांनी दिल्या.
विरोधकांच्या कपट कारस्थानांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्याचा समाचार घेण्यासाठी या निवडणुकीत सज्ज रहा असे आवाहन करताना ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पुढे म्हणाले की, या निवडणुकीत शंकररावांना इतका लिड द्या की विरोधकांनी पुढच्या वेळेस निवडणुकीचे नावच घेतले नाही पाहिजे. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे असा विश्वास व्यक्त करतानाच सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्यासाठी शंकरराव आग्रह धरतील असा विश्वासही त्यांनी उपस्थित महिलांना दिला. जीवाभावाच्या कार्यकर्त्यांची संघटना हीच आपली ताकद आहे. ती मजबूत ठेवा, मनाशी खूणगाठ बांधून शंकरराव गडाख यांना विधानसभेच्या या निवडणूकीत प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करा असे आवाहन यशवंतराव गडाख यांनी यावेळी केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूव झालेल्या सभेत बोलतांना आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेची मशाल घराघरात पोहचवा असे आवाहन केले. महाविकास आघाडीला जसे लोकसभेला यश मिळाले त्याच प्रमाणे यश या निवडणुकीत मिळणार असून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत तालुक्याचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा निर्धार आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.आरोप करून हिडीस राजकारण करण्याचा विरोधकांचा डाव वेळीच ओळखा, विजयश्री प्राप्त करण्यासाठी आपआपसातील मतभेद मिटवा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
या प्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी आमदार पांडुरंग अभंग, अशोक गायकवाड, ॲड. अण्णासाहेब अंबाडे, भेंडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, रामनाथ महाराज पवार, युवा शेतकरी विक्रम पवार, दादासाहेब चिमणे यांनी आपल्या भाषणातून तालुक्याच्या विकासासाठी शंकरराव गडाख यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी शिरसगाव येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी गडाख गटात प्रवेश केला यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या