-
दै.ज्नगरशाही भेडा – वृत्तसेवा
आर्थिक परिस्थिती अडचणीची असणाऱ्या एकल महिलांना नेवासा तालुका साऊ एकल महिला समितीच्या माध्यमातून उदयकाळ फाउंडेशन आयोजित किसानपुत्रांची भाऊबिज या उपक्रमांतर्गत दिवाळीसाठी किराणा मालाचे मोफत वाटप करण्यात आले .
दि.२७ रोजी भेंडा येथील नागेबाबा भक्तनिवास मध्ये झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कावीळ उपचार केंद्राचे संचालक सुनीलराव वाबळे व प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाफणा उपस्थित होते. तालुक्यातील एकल ( विधवा ) महिला व त्यांच्या मुलांच्या विविध समस्या सोडविणे , विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देणे , त्यासाठी लागणारी विविध कागदपत्र मिळविण्यास मदत करणे आदिंसाठी समितीचे कार्यकर्ते सेवाभावी वृत्तीने कार्यरत असल्याचे कारभारी गरड यांनी प्रास्ताविकातुन सांगीतले - . समितीच्या माध्यमातून सोडविलेल्या विविध समस्या , दुर केलेल्या अडचणी व सहकार्य याबाबत येडुभाऊ सोनवणे , अप्पासाहेब वाबळे , भारत आरगडे यांनी माहिती दिली. एकल महिलांच्या समस्या सोडविताना काही आर्थिक सहकार्याची गरज लागल्यास आम्ही मदत करु असे आश्वासन सुनिलराव वाबळे व राजेंद्र बाफणा यांनी याप्रसंगी दिले. एकल महिलांनी असणाऱ्या विविध समस्या सांगीतल्या. एकल महिला समितीच्या समन्वयक रेणुकाताई चौधरी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
भेंडा – दिवाळीसाठी एकल महिलांना नेवासा तालुका साऊ एकल महिला समितीने किराणा साहित्य प्रदान केले.