- दै.नगरशाही
नेवासा, (प्रतिनिधी):
नेवासा फाटा येथे महायुती आणि मित्र पक्षातील कार्यकत्यांच्या संवाद व विचारविनिमय मेळाव्याचे आयोजन उद्या रविवारी दि. २७ रोजी सकाळी ९ वाजता लक्ष्मी मंगल कार्यालयात करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष
विठ्ठलराव लंघे यांनी दिली.
निवडणकिीचे पडघम वाजू लागले असल्यामुळे मतदारसंघात महायुती सरकारची ध्येयधोरणे, निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच व्यूहरचना ठरविण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय
आठवले गट, रयत क्रांती, जनता दल, बहुजन रिपब्लिक एकता मंच, जनसुराज्य पक्ष, लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना, जय मल्हार क्रांती संघटना, जनता दल व इतर घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यकत्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी केले आहे. सरकारची ध्येयधोरणे, निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच व्यूहरचना ठरविण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास भारतीय जनता पार्टीच्या सह मित्र पक्षाच्या कार्यकर्तानी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी केले आहे.उद्या होणाऱ्या मेळाव्यात मुरकुटे-लंघे यांच्या राजकीय भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.