सराईत गुन्हेगार देवा लष्करे दोन वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार”*
*”सराईत गुन्हेगार देवा लष्करे दोन वर्षासाठी अहिल्
*”सराईत गुन्हेगारावर हद्दपार कारवाई”*
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी: या बाबत सविस्तर वृत्त असे
पोलीस ठाणे नेवासा येथील सराईत गुन्हेगार आकाश उर्फ देवा जालिंदर लष्करे रा. संभाजीनगर, नेवासा जिल्हा अहिल्यानगर यास नेवासा पोलिसांनी पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 56 अन्वये दोन वर्षासाठी हद्दपार केला आहे.
नेवासा पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार देवा लष्करे याच्यावर पोलीस ठाणे नेवासा व शनिशिंगणापूर येथे खुनाचा प्रयत्न, गंभीर जखमी करणे, जवळ बेकायदेशीर धारदार शस्त्र बाळगणे या सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगार देवा लष्करे याच्यावर पोलिसांनी यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा वर्तनात कोणताही फरक न पडल्याने नेवासा पोलिसांनी हद्दपार कारवाई करण्यासाठी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांच्या मार्फतीने मा. उपविभागीय दंडाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे अहवाल पाठवला होता. नेवासा पोलिसांच्या या अहवालावर देवा लष्करे यास अहिल्यानगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे. त्याप्रमाणे नेवासा पोलिसांनी देवा लष्करे यास सीताफिने ताब्यात घेऊन संभाजीनगर जिल्ह्यात दाखल केला आहे.
पोलीस ठाणे नेवासा अभिलेखावरील हद्दपार होणारा या वर्षीचा हा सातवा सराईत गुन्हेगार आहे. नेवासा गुन्हे अभिलेखावरील आणखी काही सराईत गुन्हेगार हे हद्दपार करण्यासाठी लाईनमध्ये आहेत तसेच आणखी काही गुन्हेगारांबाबत विचार विनिमय चालू आहे.
वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या सराईत गुन्हेगाराबाबत या पुढेही असेच कठोर धोरण अवलंबले जाईल असा ईशारा पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी पुन्हा दिला आहे.
सदरची हद्दपार कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासाकडील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
हद्दपार सारखी कारवाई करून देखील सराईत गुन्हेगारावर सुधारणा झाली नाही तर त्याच्यावर एम.पी.डी.ए. सारख्या कठोर कायद्यान्वये कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही.
धनंजय जाधव
पोलीस निरीक्षक
पोलीस ठाणे नेवासा
अनिल विठ्ठल नाबदे रा. शिरसगाव ता. नेवासा याच्यावर देखील सहा महिन्यासाठी हद्दपार कारवाई करण्यात आली आहे.