“सराईत गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. अंतर्गत धडक कारवाई”
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी:
याबाबत सविस्तर वृत्त असे
पोलीस ठाणे नेवासा येथील सराईत वाळू चोर सोमनाथ आसाराम हिवरे रा. कुंभार गल्ली नेवासा जिल्हा अहिल्यानगर यास नेवासा पोलिसांनी महाराष्ट्र डेंजरस ऍक्टिव्हिटी ॲक्ट म्हणजेच एम.पी.डी.ए. अंतर्गत जेलमध्ये जेरबंद केला आहे.
नेवासा पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार सोमनाथ हिवरे याच्यावर पोलीस ठाणे नेवासा, शनिशिंगणापूर व शेवगाव येथे गौण खनिज वाळू चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगार सोमनाथ हिवरे याच्यावर पोलिसांनी यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा वर्तनात कोणताही फरक न पडल्याने नेवासा पोलिसांनी
एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्फतीने मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे अहवाल पाठवला होता. नेवासा पोलिसांच्या या अहवालावर सोमनाथ हिवरे यास मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सोमनाथ हिवरे यास आज सीताफिने ताब्यात घेऊन नेवासा पोलिसांनी नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे तातडीने दाखल केले आहे.
एम.पी.डी.ए. कायदे अंतर्गत जेलमध्ये घातल्याचा या वर्षीच्या पोलीस ठाणे नेवासा अभिलेखावरील हा तिसरा सराईत गुन्हेगार आहे. नेवासा गुन्हे अभिलेखावरील आणखी काही सराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी लाईनमध्ये आहेत तसेच आणखी काही गुन्हेगारांबाबत विचार विनिमय चालू आहे.
वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या सराईत गुन्हेगाराबाबत या पुढेही असेच कठोर धोरण अवलंबले जाईल असे सुतोवाच पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी पुन्हा केले आहे.
सदरची महाराष्ट्र पोलीस प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी ॲक्ट कायद्यांतर्गतची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासाकडील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
एम.पी.डी.ए. सारखी कारवाई करून देखील सराईत गुन्हेगारावर सुधारणा झाली नाही तर त्याच्यावर मोका सारख्या कठोर कायद्यान्वये कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही.
धनंजय जाधव
पोलीस निरीक्षक
पोलीस ठाणे नेवासा