29.8 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

महायुती मधील नेवासा ही जागा राष्ट्रवादी पक्षाला मिळावी म्हणून अजित दादा पवार अब्दुल शेख या तरुणासाठी आग्रही*

**यंदा नेवासा विधानसभा फिरतेय एका बत्तीस वर्षाच्या तरुणाभोवती*

दै‌.नगरशाही नेवासा प्रतिनिधी/समीर शेख  : राज्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. नेवासा तालुक्यातील महायुती घटक पक्षातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, आदी मित्र पक्षाचे स्थानिक नेते मुंबई मध्ये ठाण मांडून आहे. अश्या परिस्थितीत एक बत्तीस वर्षाचा तरुण लोकांचे विविध प्रश्न सोडवण्यात धन्यता मानतो आहे. आई पिठाची गिरणी चालवते, तर बाप कंडक्टर, बस मध्ये लोकांना तिकीट देणारे..इमान इतबारे कर्म हिच पुजा मानून सदैव उद्योग शील कुटुंब म्हणून सर्व समाजात लोकप्रिय.
अब्दुल ने अगदी लहान वयात असताना सर्व धर्मातील मुले एकत्र करुन कुकाणा शहरात बाल गणेश मंडळ स्थापन केल. जी व्यावसायिक आणि प्रौढ बुद्धी इतरांना खुप उशीराने येते ती त्याला अगदी कमी वयातच आली परंतु घरातील आर्थिक परिस्तिथी बघून कमी वयातच व्यावसायिक बुद्धी असणारा हा युवक संघटना कौशल्य आणि मित्र परिवार बनवण्यात तरबेज झाला व नंतर सर्वांचा जिवलग..भैय्या म्हणून अब्दुल ने जनमानसात स्थान निर्माण केले.

नगर येथील एक नामांकित विद्यालयात शिक्षण घेत असताना मित्र परिवार गोळा केला. वसतिगृहातील मित्रांना नेहमी मदत करणारा हा अवलिया. लहानपणापासून मित्रांना मदत करणे हा स्वभाव.
समाजकारण ची आवड बालवयातच बाळगणारे अब्दुल भैय्या पुणे येथे अजित दादा पवार यांच्या संपर्कात आल्यावर दादा भैय्या यांचे कार्य बघून प्रभावित झाले. दहा नगर सेवक यांचे तिकीट त्यांच्याकडे होते. पाच स्वतःकडे ठेवले तर पाच पक्षातील वरिष्ठ यांच्याकडे दिले. अब्दुल ने पुणे शहरात पाच पैकी चार नगर सेवक नियोजन करुन निवडूनही आणले. ज्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि स्थानिक नेते मंडळी तसेच पक्षाचे वरिष्ठ खुप प्रभावित झाले.
राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित दादा पवार यांचे खंदे समर्थक म्हणून अब्दुल भैय्या प्रसिद्ध आहेत. नेवासा तालुक्यात विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे त्यांचे कार्य अद्वितीय आहे. लाडकी बहीण योजना लाभ सर्व धर्मातील महिलांना भगिनींना या भावाने मिळून दिले. निराधार महिलांना आधार देऊन योजनेचा लाभ मिळवून दिला. नेवासा तालूकाच नव्हे तर राज्यातील कित्येक बांधकाम मजूर यांना बांधकाम योजनेतून हजारो किट मिळून दिल्या. बांधकाम मजूर मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून स्कॉलरशिप मिळवून दिल्या. भांड्याचे संच मिळून दिले. अपघातात मृत झालेल्या बांधकाम मजूर यांना पाच लाख रुपये पर्यंत निधी मिळवून विमा पास केला. बांधकाम मजुरांसाठी घराला सात लाख रुपये शेकडो गरजूंना लाभ दिला.
बचत गटाच्या महिलांची प्रकरणे मार्गी लावली. फायनान्स कंपनी करीत असलेली लूट शासन आणि प्रशासन यांच्या लक्षात आणून दिली. जिल्हा अधिकारी आणि नेते अजित दादा पवार यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष भेट घेऊन उपेक्षितच लोकांना न्याय मिळून दिला.
नेवासा तालुक्यातील महायुतीचा कुठलाही उमेदवार विजयी करण्यासाठी अब्दुल शेख यांची भूमिका फार महत्वाची आहे. सर्व जाती धर्मातील लोक, तरुण, तरुणी, ज्येष्ठ मतदार यांचे अब्दुल शेख यांना समर्थन आहे. माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नुकतेच राष्ट्रवादी चे नेते अजित दादा पवार यांची भेट घेतली. नेवासा तालुक्यातील राजकीय चर्चा झाली. अब्दुल शेख यांचे कार्य बघून अजित दादा थक्क झाले. कार्यकर्ता कसा असावा असे जाहीर सभेत अब्दुल शेख याच तरुणाचे प्रामुख्याने नाव घेतात. नेवासा विधानसभा दुसरी यादी राष्ट्रवादी पक्षाची जाहीर होताच अब्दुल शेख हे नाव दिसल्यास नवल वाटू नये. कारण अब्दुल शेख यांच्या कार्याची दखल माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी देखील घेतली आहे.
नेवासा विधानसभा जोरदार वारे वाहत असताना अब्दुल शेख नावाचे वादळ देखील तालुक्यात आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे अब्दुल भैय्या यांच्या तिकीटासाठी आग्रही असतानाच महायुतीचा उमेदवार नेवासा तालुक्यातून गुलाल घेणार अशी प्रत्येक गावातील कट्ट्यावर, उघड-उघड चर्चा होतं आहे.

Related Articles

ताज्या बातम्या