22.8 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img

विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी – अशोक गर्जे 

 

दै.नगरशाही शेवगाव  प्रतिनिधी— ( जयप्रकाश बागडे )

शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील श्री भगवान विद्यालयात डाॅ अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन दिनाचे आयोजन करण्यात आले होते .

कार्यक्रमात  आरोग्य अभियान अंतर्गत ,प्रजनन व बाल आरोग्य टप्पा _2 अंतर्गत राष्टीय किशोर स्वास्थ कार्यक्रम , जिल्ह्यातील किशोरवयीन मुला—मुलींना मैत्रीपूर्ण आरोग्यसेवा पुरविण्याकरिता 10 ते 19 वयोगटातील युवक युवतींसाठी संवाद आणि सेवा केद्रा तर्फे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते ,

आरोग्य साहाय्यक अशोक गर्जे यांनी निसर्गाचे महत्त्व सांगताना म्हटले की , प्रत्येक माणसाला एक वर्षाला दीडशे किलो ऑक्सीजन लागतो आणि एक झाड एक वर्षाला साधारणतः शंभर किलो ऑक्सिजन देते , प्रत्येकाला झाडाचे महत्व कळाले पाहिजेत , आपला वाढदिवस साजरा करायचा असेल तर प्रत्येकाने दोन झाड लावणे महत्त्वाचे आहे ,

विद्यालयाचे पर्यवेक्षक लक्ष्मण गागरे सर यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांनी बहुश्रुत असावे , जास्तित जास्त पुस्तकाचे ,

संदर्भ ग्रंथाचे वाचन केल्यास योग्य ते ज्ञान प्राप्त होते ,म्हणुन वाचन हे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले ,

या प्रसंगी पर्यवेक्षक लक्ष्मण गागरे यांनी पाहुण्यांचा सन्मान केला , या कार्यक्रमासाठी ग्रामीण रूग्णालय शेवगावचे काउन्सलर धोंडीराम पारे,काउन्सलर उमेश इंगळे , प्रमोद जोशी,विशाल मुळे,श्रध्दा नजन , रूषिकेश फुंदे ,बबन घुले ,राजेंद्र मराठे व्यासपिठावर उपस्थित होते , इयत्ता सातवी मधील समर्थ भाकरे व सौरभ गवंडर या विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्व व वाचलेल्या पुस्तकाचे संदर्भ सांगीतले.कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी वर्ग सहभागी झाले होते.

 

 

Related Articles

ताज्या बातम्या