25.5 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

बायजाबाई जेऊर येथील बनकर वस्तीवर दि.१६ ऑक्टोबर पासून पंचदिनी किर्तन महोत्सव

  • दै.नगरशाही नेवासा(प्रतिनिधी)नगर तालुक्यातील बायजाबाई जेऊर येथील बनकर वस्तीवर असलेल्या यमाई माता मंदिरामध्ये  बुधवार दि.१६ ऑक्टोबर पासून पंचदिनी किर्तन महोत्सव सोहळयाचे आयोजन श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पीठ संस्थानचे महंत गुरुवर्य हभप श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने भागवताचार्य पंडित महाराज भुतेकर व सुदाम महाराज चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली यमाई माता भक्त मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.
    बुधवार दि.१६ ते रविवार दि.२० ऑक्टोबर या कालावधीत  होणाऱ्या पंचदिनी किर्तन महोत्सव सोहळयात पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ८ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत किर्तन,नंतर महाप्रसाद
    असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.पारायण व्यासपीठ प्रमुख म्हणून ज्ञानेश्वरी प्रवक्ते हभप नारायण महाराज ससे,हभप कोंडीराम महाराज पेचे,हभप सोले अण्णा व दत्त योगीराज आश्रम मुळेवाडी  विद्यार्थी वृंद सेवा देणार आहे.
  • रविवारी दि.२० ऑक्टोबर रोजी देवगड संस्थानचे महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या सकाळी  ९ ते ११ यावेळेत होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने पंचदिनी किर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे.पंचदिनी किर्तन महोत्सवाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा,ज्ञानेश्वरी पारायणाचा व होणाऱ्या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बनकर पाटील व कोथिंबीरे पाटील परिवार व  यमाई माता भक्त मंडळ पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या