17 C
New York
Monday, May 25, 2026

Buy now

spot_img

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नेवासा पोलिसांचा जमाव विसर्जन सराव आणि रूट मार्च संपन्न**

नेवासा पोलिसांचा  रूट मार्च संपन्न**
**दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी:**
आगामी बकरी ईद, अहिल्याबाई होळकर जयंती व इतर सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, आज शेवगाव पोलीस उपविभाग यांचेकडून पोलीस उपविभागातील अधिकारी कर्मचारी यांचा जमाव विसर्जन सराव (Riot Control Drill) आणि रूट मार्चचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदरचा सराव **अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री. मुंमक्का सुदर्शन** आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे** यांच्या विशेष सूचना व मार्गदर्शनाखाली पार पडला.

शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. नीरज राजगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी १०.०० ते ११.१५ या वेळेत नेवासा बस स्थानक येथे हा जमाव विसर्जन सराव घेण्यात आला.

यानंतर शहरातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च नेवासा बस स्थानक येथून सुरू होऊन गणपती चौक, नगरपंचायत चौक, खाटीक गल्ली, भराव गणपती मंदिर, मारुती मंदिर, हेडगेवार चौक या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत नेवासा पोलीस स्टेशन येथे संपन्न झाला.

**सहभागी अधिकारी व अंमलदार:**
या सरावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा दंगल नियंत्रण साहित्यानिशी सहभागी झाला होता. * शेवगाव उपविभागातील अधिकारी आणि ४० पोलीस अंमलदार. सरावकामी उपस्थित होते
सदरचा जमाव विसर्जन सराव अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि यशस्वीरित्या पार पडला. आगामी काळात सर्व सण आणि उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे.
**— सागर ढिकले पोलीस निरीक्षक, नेवासा शहर पोलीस स्टेशन**

Related Articles

ताज्या बातम्या