बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या एमरजेंसी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
सगळीकडे या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक सुरु आहे. कंगनासध्या तिच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यानिमित्तानं कंगनानं राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलताना कंगनानं बॉलिवूडच्या पार्टीजवर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाला विचारण्यात आलं की इंडस्ट्रीमध्ये तिचे कोणी मित्र आहेत? यावर त्यांनी सांगितलं की हे बघा मी बॉलिवूड टाईपची व्यक्ती नाही. मी बॉलिवूडमधील लोकांची मैत्रिण नाही होऊ शकत. बॉलिवूडचे लोक स्वत: चा विचार करणारे आहेत. ते मूर्ख आहेत. त्यांना काही कळत नाही. त्यांचं आयुष्य हे प्रोटीन शेकच्या आजुबाजूला फिरतं.