महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील एक कोटींहून अधिक महिलांना या योजनेंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.
या योजनेच्या अर्जासाठी जुलै महिन्यापासून सुरूवात झाली. पण रक्षाबंधनाचा सण येऊ घातल्याने लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे हफ्ते म्हणजेच एकूण 3000 रूपये जमा व्हायला सुरूवात झाली आहे. अजूनही ही प्रक्रिया सुरु आहे. परंतु, ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काय करावं? यासंदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केल्या आहेत. (Majhi Ladki Bahin Yojna your Application approved but money not received know the reason about it)
31 ऑगस्ट अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना खास सरकारकडून राबवण्यात येत आहे. पण, अनेक महिलांच्या खात्यात अजूनही 3000 रूपये जमा झालेले नाहीत अशावेळी त्यांनी खालीलप्रमाणे दिलेल्या या गाईडलाईन फॉलो केल्या पाहिजेत.
महिलांनी ‘या’ गोष्टींची तपासणी करावी
- तुम्ही माझी लाडकी बहीण पोर्टल किंवा नारीशक्ती दूत अॅपवरुन अर्ज केला आहे. तो मंजूर झाला आहे. परंतु पैसे बँक खात्यात आले नाही? तर आपले बँक खाते आधारकार्डशी लिंक आहे की नाही? हे तपासून पाहा.
- बँक खाते आधारकार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा. त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील.
- तुमच्या मोबाइलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे. त्यानंतर त्या त्रुटीची पुर्तता करुन अर्ज पुन्हा सबमिट करावा.
- आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहावे.