3.7 C
New York
Sunday, December 7, 2025

Buy now

spot_img

महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरवडी ,दत्तक घेण्याचा संकल्प – अब्दुल भैय्या सामाजिक प्रतिष्ठान*

 

*महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरवडी ,दत्तक घेण्याचा संकल्प – अब्दुल भैय्या सामाजिक प्रतिष्ठान*

तरवडी : आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरवडी दत्तक घेण्याचा संकल्प *अब्दुल भैय्या सामाजिक प्रतिष्ठान तसेच सचिन दरवडे, संदीप घोडके, अनिल नाईक, संजू भाऊ खळेकर, शंकर कनेरकर* यांनी जाहीर केला.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला व विचारांना विनम्र अभिवादन करण्यापासून झाली. सामाजिक बांधिलकी, शिक्षण, समानता आणि प्रबोधन यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

यानंतर उपस्थित मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाचे महत्त्व, आदर्श समाज निर्मितीत विद्यार्थ्यांची भूमिका तसेच महात्मा फुले यांनी समाजासाठी केलेल्या क्रांतिकारी योगदानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी शाळेतील चव्हाण सर, जाधव मॅडम, धानापुरे मॅडम, संगम मॅडम उपस्थित होत्या. शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

अब्दुल भैय्या सामाजिक प्रतिष्ठान आणि गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढील काळात शैक्षणिक विकास व सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या