मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांचा अब्दुल भैया सामाजिक प्रतिष्ठानतर्फे सत्कार
नेवासा प्रतिनिधी कुकाणा (ता. नेवासा) येथे जिल्हा सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा माजी आमदार सन्माननीय चंद्रशेखर घुले पाटील यांनी अब्दुल भैया शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देत मैत्रीपूर्ण संवाद साधला.
या भेटीदरम्यान
अब्दुल भैया शेख यांच्या कुटुंबाच्या वतीने तसेच
अब्दुल भैया सामाजिक प्रतिष्ठानतर्फे मा.आ.चंद्रशेखर
घुले पाटील यांची जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल मान्यवर सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत पुढील वाटचालीस यश चिंतले.
यावेळी चंद्रशेखर घुले पाटील भाऊ यांनी अब्दुल भैय्यांच्या सामाजिक कार्याची सविस्तर माहिती जाणून घेतली. “येणाऱ्या काळात पक्ष आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. आपण असेच ठाम राहून कार्य करा…” अशा शब्दांत त्यांनी शेख यांना प्रोत्साहन दिले.
अब्दुल भैया शेख यांनी सांगितले की, वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळणारे मार्गदर्शन आणि पाठबळ ही स्वतःसाठी मोठी प्रेरणा असून समाजातील सर्वसमावेशक सेवेसाठी आखलेल्या उपक्रमांना सामान्य लोकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच खरी ताकद आहे.
या कार्यक्रमाठी प्रा.गणेश देशमुख यांच्यासह प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.










