- दै.नगरशाही नेवासफाटा प्रतिनिधी – विज्ञानाच्या माध्यमातून विचित्र रूढी परंपरा बंद करा, जिज्ञासू, चिकित्सक वृत्तीने अभ्यास करा, असे प्रतिपादन जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन उद्घाटना वेळी जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी केले.

शिक्षण विभाग (माध्यमिक),जिल्हा परिषद अहिल्यानगर व राज्य विज्ञान संस्था, रविनगर, नागपूर आणि त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री. दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुकिंदपुर यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय प्रदर्शन उद्घाटनासाठी आलेल्या मान्यवरांचे सैनिकी बँड पथकाने स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संकुलातील अमर जवान स्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.तदनंतर प्रदर्शन स्थळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद अहिल्यानगर माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर यांनी केले. आलेल्या पाहुण्यांचा, मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष ॲड स्नेहल चव्हाणपाटील यांनी प्रदर्शनातील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. नेवाशाचे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद अहिल्यानगर माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी श्रीमती संध्या भोर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती मीना शिवगुंडे, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक श्रीराम थोरात, पंचायत समिती नेवासा गटशिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी, विज्ञान अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ शिंदे, गणित अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ घुले, विज्ञान अध्यापक संघाचे जिल्हा सचिव धनंजय भांगरे,नेवासा तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिन कर्डिले, तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष तुकाराम फटांगरे, केंद्रप्रमुख रवींद्र कडू पाटील, तज्ञ मार्गदर्शक मोहंमद समी सर,श्री.दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सोपान काळे, त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य अरविंद देशमुख, त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे उप प्राचार्य दत्तात्रय वांढेकर,श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य शांतीलाल मेहेत्रे, पर्यवेक्षक संजयसिंह चौहान,विभाग प्रमुख संतोष निंबाळकर, बाळासाहेब साबळे,प्ना.राजेंद्र कात्री, एकनाथ कापसे,दत्तू गर्जे, नामदेव ताके, अंजली होन, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक लक्ष्मण दळे व अरविंद देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय कवळे यांनी मानले.










