वसई प्रतिनिधी/राजेंद्र ढगे
लायन्स क्लब ऑफ वसई युनिकच्या वतीने लायन्स पीस पोस्टर स्पर्धा दिनांक14/11/2025 रोजी सकाळी 9 ते 12 ह्या कालावधीत संत एलिझाबेथ शाळा, होळी, वसई येथे आयोजित करण्यात आली होती.
सदरच्या जागतिक पातळीवरील स्पर्धेत शाळेतील 22 विद्यार्थीनी भाग घेतला. लायन्स इंटरनेशनलच्या वार्षिक कार्यक्रमात जगभरातून जवळपास 6 लाख विद्यार्थी भाग घेतात आणि प्रथम क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांला 5000 अमेरिकन डॉलर चे बक्षिस दिले जाते.ह्या कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ वसई युनिकचे अध्यक्ष श्री नीलेश घरत, सचिव श्री दीपक बडगुजर, माजी अध्यक्ष सतीश कोथमिरे, विभागीय अध्यक्ष श्री मार्सियन अल्वेस, सेट एलिझाबेथ कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर स्मिता आगासकर स्पर्धे मध्ये भाग घेतलेले 5वी ते 8वी चे विद्यार्थी आणि शिक्षक वृंद हजर होते हि स्पर्धा मोठ्या संख्येने व उत्साहात संपन्न झाली याच्या तयारीसाठी शाळेतील भानुप्रताप सिंग यांनी तयारी केली










