नागेबाबा मल्टिस्टेटच्या विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन…
नेवासा(तालुका प्रतिनिधी):— स्वकर्म पुष्पांनी सर्वात्मक ईश्वराची आपल्याला पूजा करायची आहे, फुल किंवा फुलांच्या हारांचे काही क्षणात निर्माल्य होते, मात्र स्वकर्म रूपी पुष्प कधीही सुकत नाही की त्याचे निर्माल्य होत नाही.नागेबाबा पतसंस्था ही संत-महंताचा आशीर्वाद घेऊन कडूभाऊंनी निर्माण केलेली संस्था आहे. एका शाखेच्या अनेक शाखा झाल्या, राज्यात आणि बाहेरच्या राज्यात ही नागेबाबाच्या कार्याचा सुगंध दरवळत आहे असे असे गौरवउद्गगार श्रीक्षेत्र देवगड संस्थांचे महंत भास्करगिरी जी महाराज यांनी काढले.
श्रीसंत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटीच्या आगामी २०२६ या नवीन वर्षाच्या ‘नागेबाबा विचारधन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते संस्थेच्या अहिल्यानगर येथील मुख्यालयात झाले.त्यावेळी ते बोलत होते.नागेबाबा मल्टिस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, नागेबाबा संस्थांनचे अध्यक्ष शिवाजीराव तागड, डिझाईनर ज्ञानेश शिंदे,संजय मानवेलीकर, आबासाहेब काळे, सुनील, गव्हाणे,बाबासाहेब गायकवाड, ऍड.सुनील शिंदे, रंगनाथ गव्हाणे,सुभाष चौधरी, प्रशांत येमुल, गणेश आर्टचे गणेश दळवी, कॉर्पोरेट ट्रेनर संदीप पाटील, बाळू महाराज कानडे, नागेबाबा मल्टिस्टेटचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कदम, सरव्यवस्थापक भरत दारुंटे यांचेसह नागेबाबा परिवाराचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
महंत भास्करगिरीजी महाराज पुढे म्हणाले की, आपल्या वाट्याला आलेले कर्म कसोटीने करा. अधिक फायद्याच्या-सन्मानाच्या मागे न लागता गरजवंतांची मदत करा. व्यक्ती,संघटना किंवा संस्थेच्या माध्यमातून जे करायचे ठरवले ते जिद्द चिकाटी एका क्षेत्राखाली आले की सहज शक्य होते.
कर्मचाऱ्यांच्या अंतरिक भावनेने व कष्टाने आपल्याला सुलभ हे कार्य सुलभ होईल. अर्थरूपी धना बरोबरच विचाराचे धन जपण्याचे काम संस्थेने केले. संस्था प्रथम आणि नंतर व्यक्ती या पद्धतीने काम व्हावे. जेव्हा व्यक्ती पुढे येते आणि संस्था मागे पडते त्यावेळी कुठेतरी त्या संस्था अडकलेल्या दिसतात. संस्थेच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी प्रथम देश हित ठेवून काम करावे. घेतले आणि परत केलेच नाही तर त्या माणसाची पत राहत नाही, म्हणून प्रत्येकाने आपली पत सांभाळले पाहिजे.
अहिल्यानगर शहरामध्ये इतर गावातून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सभासद रुग्णांना व सोबतच्या व्यक्तीस २ वेळेस मोफत जेवणाची सुविधा हे संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे.
नागेबाबा मल्टिस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कदम यांनी प्रास्ताविक केले. योगीता पटारे यांनी सूत्रसंचालन केले.संजय मनवेलीकर यांनी आभार मानले.










