दै.नगरशाही भेंडे प्रतिनिधी –
कार्यकारी अभियंता
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना भेंडा बुद्रुक सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेती फिडर वरील सिंगल फेज वीज पूर्णदाबाने व सायंकाळी ६ वा द्या अन्यथा दि, ७ नोव्हेंबर रोजी मशाल मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन दिल्याचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले.
या विषया नुसार निवेदनात म्हंटले आहे कि भेंडा बु !! सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या भानसहिवरा, गोंडेगावं, आणि रांजणगाव फिडर वरील वीज खुपच कमी दाबाने येते त्यामुळे बल्बच्या खाली सुद्धा अंधार असतो त्यामुळे सदर वीज पूर्ण दाबाने द्यावी.

तसेच सायंकाळी ६ वा सध्या पूर्ण अंधार पडलेला असतो त्यामुळे विद्यार्थी अभ्यास करायला अडचण येते आहे व परिसरात सर्वत्र दररोज कुठेतरी बिबट्याने शेळ्या, कुत्रे, जनावरे खाण्याचा प्रकार होत आहे अशा घटनेमुळे नागरीक दहशतीत आहेत
म्हणुन तातडीने शेतीच्या ट्रान्सफार्मर वरील सिंगल फेज वीज पूर्ण दाबाने सायंकाळी ६ वा देण्यात यावी या बाबत आपले अधिकारी श्री मालुसरे साहेब यांना अनेक वेळेला तोंडी सांगितले आहे परंतु कुठलीही दुरुस्ती या संदर्भात आपल्या कार्यालया कडुन झाली नाही
म्हणुन आता तातडीने या बाबत अंमल बजावणी न झाल्यास शुक्रवार दि, ७/११/२०२५ रोजी सायंकाळी ६ वा भेंडा बु !! सबस्टेशन येथे परिसरातील नागरिकांच्यासह मोठ्या संख्खेने हातात मशाल घेऊन मोर्चा काढण्यात यावेळी होणाऱ्या परिणामांची जबाबदारी आपल्या वर याची नोंद घ्यावी
सौंदाळा ग्रामपंचायतने विद्यार्थी अभ्यास करावेत यासाठी सायंकाळी ६ ते ८ भोंगा वाजून मुलांना अभ्यास करण्यासाठी बसण्याच्या सुचना देण्याचा उपक्रम सुरु केलेला आहे परंतु वाडया वस्तीवर सायंकाळी ७ वा वीजपुरवठा होतो तो देखील कमी दाबाने होतो म्हणुन या मागणी बाबत तातडीने निर्णय न झाल्यास सौंदाळा, रांजणगाव, गोंडेगावं, खुणेगांव, भेंडा खुर्द, नजिक चिंचोली ग्रामस्थांनी देखील आंदोलनात सहभागी होण्याचा पवित्रा घेतला आहे










