नेवासा, प्रतिनिधी १३ सप्टेंबर – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश दादा आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे घरेलू महिला कामगार महिलांसाठी विशेष कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अविनाश दादा आदिक व युवा नेते अब्दुल भैय्या शेख यांच्या शुभहस्ते पार पडले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून उपस्थित महिलांना ओळखपत्र स्वरूपातील कार्डांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना अविनाश दादा आदिक म्हणाले की – “अब्दुल शेख यांच्या पाठीशी उभे रहा, बाकी तुमच्या भागाच्या विकासाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वीकारतो.” या प्रसंगी
अशोकराव मोरे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
निलेशभाऊ सरोदे (विराट प्रतिष्ठान)
किशोरभाऊ गारुळे (सरपंच, बेलपिंपळगाव)
सुरेशराव डिके
बाबासाहेब नवथर पाटील
संदीप लष्करे
अभय तूवर
संभाजी जाधव
चंद्रशेखर गटकळ
सर्पमित्र पुरुषोत्तम चिंधे
कृष्णा शिंदे
प्रा. किशोर गटकळ
अनिल पुंड
भारत चौघुले
संजय वाघमारे पाटील
राहुल कांगुणे
राजेंद्र धिरडे (शाखाध्यक्ष)
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष वसंतराव कांगुणे, धर्मरक्षक गणेश चौघुले सर, प्रा. अशोक गाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
युवानेते अब्दुलभैय्या शेख यांनी आपल्या भाषणात सांगितले की – “महिला भगिनींना आर्थिक सक्षम करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामार्फत सर्वांपर्यंत पोहोचवली जाईल.”
या प्रसंगी महिलांची वाढती उपस्थिती ची जोरदार चर्चा रंगली होती.










