5 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img

सर्वच रस्त्यावर प्रचंड खड्डेच खड्डे वाहने दुरुस्ती व दवाखाना निधी नाके उभारा – कारभारी गरड रस्ता कर व रस्ता सुरक्षितता निधी कशासाठी ?

रस्ता कर व रस्ता सुरक्षितता निधी कशासाठी ?
विशेष प्रतिनिधी भेंडा – वृत्तसेवा
अहिल्यानगर – संभाजीनगर या राज्य मार्गावरील प्रचंड प्रमाणात असणारे खड्डे बघता वाहन दुरुस्ती व वाहन चालक –
प्रवासी यांना दवाखाना उपचार खर्च यासाठी राज्य शासनाने मदतनिधी नाके कार्यान्वित करावेत,अशी मागणी संत गाडगेबाबा रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष कारभारी गरड यांनी केली आहे.
कोणत्याही रस्त्याचे काम सुरू करण्यापासून त्याचे अंतिम बिल घेईपर्यंत प्रत्येक ठिकाणी टक्केवारी ठरलेली असते.या टक्केवारीच्या बाजारामुळे दर्जा व गुणवत्ता राखला जात नाही.भरमसाठ रस्ता कर भरूनही मान दुखी, पाठ दुखी,कंबर दुखी,मनके दुखी यासारखे आजार मागे लागतात. वाहने खिळखिळी होतात,त्यांच्या दुरुस्तीचा खर्च वेगळाच. त्यामुळे वाहनांकडून ज्याप्रमाणे टोल वसुली केली जाते, त्याप्रमाणे रस्त्यावरील खड्ड्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक वाहनास मदत निधी देण्याची नितांत आवश्यकता असल्याचे गरड यांनी म्हटले आहे. यापूर्वी झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील गाव रस्त्यापासून ते राज्य व राष्ट्रीय महामार्ग प्रचंड प्रमाणात खड्डे युक्त झालेले आहेत.या खड्डे मय रस्त्यावरून प्रवास करताना अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्ता कर व रस्ता सुरक्षितता निधी कुणासाठी ? कोठे ? व कसा वापरतात ?
नवीन दुचाकी खरेदी करताना एकूण रकमेच्या ९ टक्के रस्ता कर एकरकमी वसूल केला जातो. तसेच ४ चाकी वाहन असेल तर १० लाखापर्यंत १३ टक्के, २० लाखापर्यंत १४ टक्के व त्यापुढे १५ टक्के रस्ता कर व रस्ता सुरक्षितता निधी एकरकमी आकारला जातो. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर वजनाच्या प्रमाणात करा कारणे केली जाते. तसेच व्यावसायिक वाहनास ८ वर्षानंतर पर्यावरण कर आकारला जातो. शिवाय नवीन राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग उभारल्यानंतर टोलनाके सुद्धा असतातच .
कोणतेही नवीन वाहन खरेदी करताना त्या वाहनाचा ग्राहकाकडून रस्ता कर व रस्ता सुरक्षितता निधी आगाऊ वसूल केला जातो.मात्र वाहनाची मर्यादा संपेपर्यंत त्या वाहन चालकांना व प्रवाशांना अतिशय धोकादायक पद्धतीने सर्वच रस्त्यावरून प्रवास करण्याची वेळ येते त्यांस जबाबदार कोण ? अगदी ग्रामीण रस्ते , राज्य व राष्ट्रीय महामार्ग सुद्धा अतिशय खराब व खड्डेमय झालेले दिसून येतात. एकतर नवीन रस्ते तयार करताना किंवा त्या रस्त्याची दुरुस्ती करताना अंदाजपत्रकात दर्शविल्याप्रमाणे पूर्ण क्षमतेचे साहित्य न वापरता निकृष्ट व दर्जाहीन काम केले जाते व त्यामुळेच रस्ते अल्पावधीत खराब होतात. कितीही जड वजनाचे वाहन गेलं तरी रस्ता खराब होऊ नये याची काळजी अंदाजपत्रक तयार करताना घेतली जाते. मात्र या टक्केवारीच्या बाजारामुळे दर्जा व गुणवत्ता राखला जात नाही.
नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे पावसाळ्यात रस्ते खराब होऊ नयेत म्हणून फारशी काळजी व दक्षता घेताना कुणी दिसत नाहीत. पावसाचे पाणी दोन्ही बाजूस ओघळुन न जाता लांब पर्यंत रस्त्यावरूनच वाहत जाते. अनेक सेतू पुलात पाणी साचून राहते. साईड पट्ट्या व्यवस्थित नसतात.एकदा वाहन खाली उतरल्यावर लवकर रस्त्यावर घेता येत नाही.
एखाद्या रस्त्याचे निकृष्ट काम चालू असल्यास त्याची तक्रार कुणी सामाजिक कार्यकर्ते किंवा संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यास ठेकेदार तसेच अर्धवट काम सोडून देतात.पुन्हा त्या रस्त्याचे कामच होत नाही.त्यामुळे उत्कृष्ट काम होण्याच्या साठी कुणी फारसा आग्रह धरत नाहीत.
——————————————————–
अहिल्यानगर – संभाजीनगर या रस्त्यावरील घोडेगाव जवळ खड्ड्यात वाहन पडल्याने एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. असे बळी घेणारे रस्ते असतील तर रस्ता कर व रस्ता सुरक्षितता निधी कशासाठी ?


———————————————————

Related Articles

ताज्या बातम्या