रक्षाबंधन सप्ताहानिमित्त अब्दुलभैय्या शेख यांचा विविध गावांमध्ये लाडक्या बहिणीकडून सन्मान.
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी :
नेवासा मतदारसंघातील माळीचिंचोरा, कुकाणा, तरवडी , जेऊर गावासह विविध ठिकाणी रक्षाबंधन सप्ताहानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांचा महिलांसाठी केलेले समाज कार्य पाहता बहिणींनी आत्मीयतेने सन्मान केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही माळीचिंचोरा येथील बहिणींनी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात शेख यांनी हजेरी लावली.
या प्रसंगी बोलताना अब्दुलभैय्या शेख म्हणाले, “बहिणींनी व्यक्त केलेले प्रेम, आत्मीयता आणि माझ्या समाजकार्यातील दखल हे माझ्यासाठी अमूल्य आहे. हा राखीबंध फक्त धागा नसून, विश्वास, प्रेम आणि एकमेकांच्या साथीसाठी दिलेलं वचन आहे. हा बंध सदैव मजबूत राहील, हीच प्रार्थना.”
कार्यक्रमादरम्यान बहिणींनी पारंपरिक पद्धतीने राखी बांधून शुभेच्छा दिल्या. शेख यांनी बहिणींच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे आश्वासन देत, नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.










