दै.नगरशाही
नेवासा तातालुका प्रतिनिधी/ समीर शेख
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील कै. संत हरिभाऊ आनंदराव घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक कै.साहेबरावजी घाडगेपाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी काकासाहेब काळे,सतिष काळे
पोपट सरोदे,ॲड.सचिन घोडेचोर,हभप. अमोल महाराज घाडगे,प्रशासक मनीषा राऊत यांनी आपल्या मनोगतातून साहेबराव घाडगे पाटील यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा दिला.याप्रसंगी वसतिगृहातील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी पूजा चनघटे हिनेही आपल्या मनोगतातून आदरांजली वाहिली.
यावेळी हभप महेश महाराज घाडगे, अरुण पाटील घाडगे,दिपक कारभारी घाडगे,मालोजीराव गटकळ बबनराव म्हस्के,गोरक्षनाथ घोडेचोर नामदेवअण्णा घोडेचोर,मधुकर घाडगे,अरविंद घाडगे, रमेश काळे,एकनाथ घोडेचोर,दिपक कनक घाडगे,अजितशेठ गुगळे,रवी काळे,विकास काळे,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे,प्रशासक मनिषा राऊत आदी मान्यवर,विद्यार्थी,सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.