दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी:
श्री मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचा २३ वा पुण्यस्मरण सोहळा पार पडला.
यावेळी प्रथम प्रा.डॉ.राजेंद्र गवळी, उप्राचार्य दीपक राऊत यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रा.सुयोग घोरपडे, सचिन गावडे, ईश्वर नरवडे, शीला गिरी कुमार, योगिता शेजुळ, सविता गायकवाड, बापूसाहेब टेकणे उपस्थित होते.
यावेळी मारूतराव घुले पाटील यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी विदयार्थिनी सानवी बानकर व आदिती पाटील तसेच शिक्षिका सविता गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता शेजुळ यांनी केले तर शीला गिरीकुमार यांनी आभार मानले.