दै.नगरशाही
कुकाणा प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना महसूल विभागाकडून राबवल्या जात असून गरजूसाठी अन्न सुरक्षा, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, संजय गांधी निराधार, आवास योजना या कल्याणकारी योजणांचा लाभ घ्यावा असे आवाहन सुधीर पाटील विभागीय अधिकारी अहिल्यानगर यांनी कुकाणा येथे कुकाणा मंडळ महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरा च्या कार्यक्रमा प्रसंगी केले.
या प्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार डॉ.संजय बिरादार,भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अंकुराव काळे जिल्हा अध्यक्ष, सरपंच दिनकराव गर्जे,सरपंच लतताई अभंग,दौलतराव देशमुख भाऊसाहेब फोलाने भाऊसाहेब सावंत,सतीशराव कर्डीले,संदीप देशमुख, मछिंद्र कावरे, मछिंद्र आर्ले हकीमाबी शेख,किरण शिंदे,मछिंद्र आर्ले,बाबासाहेब घुले,पोपराव सरोदे,किशोर मिसाळ,वैभव नवले,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलताना गायरान जमिनीतील अतिक्रमन नियमित होतात परंतु त्यातील अटी मुळे ती प्रकरणे प्रलंबित राहात असून पोट खराबा नोंद असलेली परंतु शेती लागवड योग्य सर्व प्रकरणे महसूल विभागाकडून दुरुस्त करण्यांचे काम गतीने चालु असून सर्व अशा खाते दारानी प्रतिसाद देण्याची गरज असल्याचे सुधीर पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित नागरिकांना शिबितातून मार्गदर्शन केले.
प्रसंगी सरपंच दिनकराव गर्जे, भाऊसाहेब सावंत, अंकुराव काळे, तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी मार्गर्शन केले. कार्यक्रमात
पोट खराब लागवड योग्य प्रकरणे,आपत्ती पडझडमदत,महसूली इतर दाखले,संजय गांधी निराधार योजनालाभार्थी पुरवठा विभाग लाभार्थी कोर्ट वाटप दरखास्त ताबा प्रकरण भेंडा बु. अशा पन्नास हुन अधिक लाभार्थ्यांना मदतीचे चेक तसेच, दुरुस्त केलेले सात बारा उतारे, प्रमाणपत्र वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी कुकाणा मंडळ अधिकारी तृप्ती साळवे, ग्राम महसूल अधिकारी अभिजित क्षीरसागर, प्रियंका चव्हाण, विजय काळे, बद्रीनाथ कामानदार, संजय भालेकर, राजेंद्र काळे, जॉय ओहळ, सुभाष महाशिकारे, सागर गायकवाड तसेच सेतू चालक यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ कचरे यांनी केले तर आभार मंडळ अधिकारी तृप्ती साळवे यांनी मानले.