*भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कॉ.बाबा आरगडे यांचा सन्मान*
नेवासा(तालुका प्रतिनिधी):– नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड बाबा आरगडे यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून सन्मान करण्यात आला.
रविवार दि.२२ जून रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष(सीपीआय) चे २५ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन नाशिक येथे संपन्न झाले. या अधिवेशनात पक्षासाठी योगदान देणाऱ्या जेष्ठ नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा पक्षाचे वतीने सन्मान करण्यात आला. प्रकृती स्वास्थ्यामुळे कॉ.बाबा आरगडे हे नाशिक अधिवेशनाला उपस्थित राहू न शकल्याने
सीपीआयच्या राज्य सचिव मंडळाच्या सदस्या कॉ.स्मिता पानसरे व नगर जिल्हा सचिव कॉ.बंशी सातपुते यांनी रविवार दि.२९ जून रोजी सौंदाळा येथील निवासस्थानी कॉ.बाबा आरगडे यांचा पक्षाचे सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मान केला.कॉ.आप्पासाहेब वाबळे,बाळासाहेब आरगडे,सुखदेव फुलारी कॉ.भारत आरगडे, सुर्यकला आरगडे,रेणुका चौधरी, प्रियंका आरगडे,पुष्पा आरगडे आदी यावेळी उपस्थित होते.