30.6 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

पहलगाम जम्मू काश्मीर घटनेच्या निषेधार्थ कुकाण्यात कडकडीत बंद!

  • काश्मीर घटनेच्या निषेधार्थ कुकाण्यात कडकडीत बंद

    दै.नगरशाही नेवासा
    प्रतिनिधी

काश्मीरमधील हिंदुवरील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कुकाणा ता.नेवासा येथे सर्व ग्रामस्थांच्या वतीने निषेध सभा घेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथील बैसरण घासवाटा परिसरात दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर त्याचा धर्म विचारून निर्दयपणे हत्या केली. या 28 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. ही घटना दहशतवाद्यांनी केलेली क्रूर घटना म्हणावी लागेल. भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदूंवर तसेच एका मुस्लिम देखील फायरिंग करण्यात आली.

काश्मीर घटनेचा निषेध व्यक्त करत कुकाणा बसस्थानक परिसरात
निषेध करण्यात आला. यावेळी पत्रकार सोमनाथ कचरे, व्यापारी जवाहर भंडारी, इंजिनीअर बाळासाहेब कचरे,राष्ट्रवादी चे अब्दुलभैय्या शेख, इंटक काँग्रेसचे अभिजीत लुणिया,अजिंक्य निकम ,अध्यापक शिवाजी कावरे यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करत या भ्याड हल्लाचा निषेध व्यक्त केला. तसेच निष्पाप नागरिकांना क्रूरपणे मारणारे आतंकवादी यांच्या वर सरकारकडे कडक कारवाई करण्याची मागणी केली.

समाजावर झालेले थेट आक्रमण आहे. काश्मीरमध्ये झालेल्या हिंदू धर्माच्या पर्यटकांना त्यांच्या धर्माच्या आधारे निवडून थेट गोळ्या घालून ठार मारण्यात आले. ही घटना केवळ हिंसाचार नसून ती हिंदू विरोधी आणि भारताच्या अखंडतेविरोधात उभ्या राहिलेल्या
कटाचा भाग आहे. यावेळी भारत माता की जय!वंदेमातरम!च्या घोषणा देण्यात आल्या. पाक विरोधात घोषणा देण्यात येऊन पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध व्यक्त केला.मृत पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ं
यावेळी मा.सरपंच दौलत देशमुख, मा.उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, श्रीधर कासार, , राजेंद्र बागडे,वसंतराव गरड, व्यापारी संघटनेचे सुभाष चौधरी,विष्णू फासे, राजेंद्र वर्मा,सुनिल पंडित, अर्जुन लोंढे, भारत गरड, सतिष कावरे,मुसा इनामदार, बाबासाहेब उंडे,जावेद शेख,वैभव चेमटे,राजेंद्र देडगावकर,राजेंद्र निकम,ईकलाख शहा,आदिसह मोठ्या प्रमाणावर युवक,व्यापारी उपस्थित होते.

यावेळी शेवगाव पाथर्डी चे डीवायएसपी सूनिल पाटील, डीवायएसपी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, पो.को.वाल्मिक वाघ,आदिं सह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Related Articles

ताज्या बातम्या