26.6 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

जल जीवन योजनेच्या निकृष्ट कामाबद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांचे जाहीर आमरण उपोषण.

जल जीवन योजनेच्या निकृष्ट कामाबद्दल  ,संभाजी शिंदे यांचा आमरण उपोषणाचा ईशारा .
सोनई वार्ताहर//नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथे जल जीवन योजनेच्या कामांमध्ये कुचराई होत असल्याकारणाने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.ग्रामस्थांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संभाजी शिंदे यांच्या वतीने दिनांक पाच मे रोजी खेडले परमानंद येथील मुख्य चौकात आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
याबाबतच्या पूर्वसूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे ,मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हाधिकारी ,पंचायत समिती संबंधित अधिकाऱ्या देण्यात आलेले आहे.जल जीवन योजनेच्या टाकीचे काम अनेक दिवसांपासून अपूर्ण स्वरूपात आहे टाकीचे काम झाल्यानंतर टाकीच्या बांधकामात हवे असणार पाणी न मिळाल्यामुळे
काँक्रीटची अक्षरशः राख होऊन चालली आहे .
काम पूर्ण झाल्यावर दोन ते तीन दिवस थातूरमुतूर स्वरूपात पाणी मारले गेले त्यानंतर या टाकीच्या कामाकडे संबंधित ठेकेदाराने लक्ष दिले नाही व परिणामतः सिमेंटचे रूपांतर जीर्ण राखी मध्ये होत आहे .

ग्रामस्थांनी संपर्क केल्यावर संबंधित ठेकेदार बोलबच्चन करून आज उद्या आज उद्या असे करून जवळ-जवळ दीड महिना उलटून गेला परंतु टाकीच्या काँक्रीटी करणावर पाणी मारण्याचे किंवा टाकी पाण्याने भरण्याचे नाव घेत नाही .
त्याचप्रमाणे पाईपलाईन अनेक भागात अधुऱ्या व निकृष्ट स्वरूपात करण्यात आलेल्या आहे .
या गोष्टीकडे जीवन प्राधिकरणाचे अभियंते जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे चित्र स्पष्ट होते .
संबंधित ठेकेदार व अभियंत्या विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संतोष निर्माण झाला असून ग्रामस्थांच्या वतीने प्रतिनिधीक स्वरूपात शिंदे हे उपोषण करणार आहेत.
संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती दखल न घेतल्यास व्यापक स्वरूपाचे जन आंदोलन छेडणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संभाजी शिंदे यांनी दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या