दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी- नेवासा तालुक्यातील अग्रगण्य
देवगिरी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड गेवराईच्या चेअरमन पदी श्री अर्जुन शिंदे तर व्हा. चेअरमन पदी निकिता शिंदे यांची बिनविरोध निवड,करण्यात आली.
या पतसंस्थेच्या संचालक मंडळांची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी सर्व संचालक मंडळ यांनी सहकार्य केले आज शनिवार दिनांक 19.04.2025 रोजी दुपारी 11.00 वाजता नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी सहकार तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस.व्ही.ठोंबरे साहेब प्राधिकृत अध्यायसी अधिकारी तथा मुख्य लिपक अधिन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नेवासा यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सर्वानुमते चेअरमन पदी संस्थापक अर्जुन शिंदे यांची तर व्हाईट चेअरमन पदी निकिता शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.