पहलगाम येथील पर्यटकांवर हल्ल्यात शहीद नागरिकांना श्रध्दांजली अर्पण… कुकाणा प्रतिनिधी: नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे शुक्रवारच्या नमाजनंतर जामा मस्जिद मध्ये जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता,त्या घटनेचा काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी मौलाना शमशाद पठाण यांनी इस्लाम धर्मात निष्पाप नागरिकांची हत्या, हिंसा करणे या गोष्टीला थारा नाही, त्यामुळे मुस्लिम समाजाकडून आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
यावेळी जामे मस्जिद चे अध्यक्ष रज्जाकशहा इनामदार यांनी
श्रद्धांजली वाहतांना पर्यटकांवर फायरिंग करणारे आतंकी यांना जातपात नसते, सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी इनामदार यांनी केली.
सहसचिव प्रा.शकुर शेख यांनी मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, आधी आपला भारत देश महत्वाचे असून ,दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांवर भ्याड हल्ला करणारे आतंकवादी यांना सरकारकडून जशासतसे उत्तर द्यावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी दोन मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी रशिद शेख, इमरान शेख,सलमान नालबंद,आरिफ तांबोळी, निसार सय्यद,अकील तांबोळी, चांद शेख, आदि सह युवक उपस्थित होते.