*विठ्ठल अर्बन को- आॅप क्रेडिट सो. लि च्या चेअरमन पदी श्री कृष्णा गव्हाणे तर व्हा चेअरमन पदी संतोष औताडे-पञकार यांची बिनविरोध निवड*. दै.नगरशाही भेंडा प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील श्री विठ्ठल अर्बन को- आॅप क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेच्या चेअरमन पदी संस्थापक श्री कृष्णा गव्हाणे यांची तर व्हा. चेअरमन पदी संतोष औताडे-पञकार) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडण्यासाठी सर्व संचालक मंडळ यांनी सहकार्य केले.. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी दुपारी 11 वाजता नवीन पदाधिकारी निवडीसाठी सहकार तथा निवडणूक निर्णय अधिकारी वाय .एल.नरसिंगपुरकर साहेब , प्राधिकृत अध्यासी अधिकारी तथा मुख्य लिपिक अधिन सहायक निबंधक सहकारी संस्था नेवासा यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वानुमते चेअरमन पदी संस्थापक कृष्णा गव्हाणे यांची तर व्हा. चेअरमन पदी संतोष औताडे-पञकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भेंड्या सारख्या ग्रामीण भागात पतसंस्था निर्माण होत असुन संत नागेबाबांचा आशिर्वाद असल्याचे चेअरमन कृष्णा गव्हाणे यांनी सांगितले आजच्या धकाधकीच्या काळात ज्याच्या पाठीमागे श्री संत नागेबाबा यांचा शुभ आशिर्वाद असतो तेथे कोणत्याही परिस्थितीत अपयश येत नाही तसेच परिसरातील सगळे प्रकारचे उद्योग व्यवसाय हे यशस्वी झालेले आहे . भेेंडा बु येथील विठ्ठल अर्बन को- आॅप क्रेडिट सोसायटी लि पतसंस्थेमुळे ग्रामीण भागातील लोकांना उद्योग व्यवसायासाठी सहज कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे चेअरमन कृष्णा गव्हाणे यांनी सांगितले . हि संस्था नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर आहे.
यावेळी संस्थेचे संचालक सौ.सुनिता गव्हाणे, गव्हाणे विजय, कृष्णा गव्हाणे, संदिप जावळे,संतोष औताडे, हौशिराम नवले ,कोलते बाळासाहेब, सौ. आशा जावळे, सौ. उषा गव्हाणे, संजु गव्हाणे ,वायकर किशोर तसेच संस्थेचे मॅनेजर सुरेश दरवडे , क्लार्क कृष्णा मंडलिक, कॅशियर शुभम आढागळे इ. उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा निवडणूक निर्णय अधिकारी वाय एल नरसिंगपुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.