कुकाणा प्रतिनिधी: समीर शेख
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने 20 टक्के राजकारण 80 टक्के समाजकारण हे ब्रिद वाक्य आदर्शवत ठेऊन तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख अदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुढी पाडवा सण व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रणित मायेची सावली व मुबंई शिवसेना भवन महाराष्ट्र राज्य परीवार यांच्या वतीने पुणतांबा येथील मेथडिस्ट होमच्या अनाथ शालेय विद्यार्थ्यांना मायेची सावली परीवाराच्या वतीने शालेय वस्तू ,वॉशिंग मशीन.तसेच जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब, गोंडेगावचे लोकप्रिय माजी सरपंच संभाजीराजे बढे यांचे हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी शिवसेना नेते सुहास वहाडणे होते. पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मायेची सावली या परीवाराचे वतीने अनाथ मुलांना शालेय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सोहळे अनेकवेळा महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी वर्षभरात आयोजित करण्यात येत असतात . मायेची सावली परीवार संस्थापक अध्यक्ष निष्ठावंत शिवसैनिक यशवंत खोपकर व त्यांचे सर्व सहकारी कट्टर निष्ठावंत शिवसैनिक बंधु-भगिनी यांच्या अथक प्रयत्नातुन अश्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
आज पुणतांबा येथील मेथडिस्ट चर्च बाल अनाथ आश्रम येथे वरील सर्व वस्तूंचे वाटप करण्यात आले याप्रसंगी खा.वाकचौरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून करत असलेल्या उपक्रमाविषयी पुणतांबा शहर शिवसेनेचे व मायेची सावली परीवाराचे कौतुक करत आपण भविष्यात या अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करु या सेवेत मी सदैव आपले पाठीशी तत्पर उपलब्ध राहील असे सांगितले. मायेची सावली महाराष्ट्र राज्य परीवार संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर संदिप चांदिवडे. मेघा सावंत. जॉन पिटर साहेब.संजय पारधे सर यांनी विचार मांडले. सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीचा आदर्श जपुन आम्ही शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख अदित्यसाहेब यांचे मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्यातील अनाथ आश्रमाधील मुलांचे संगोपनासाठी शिवसैनिकांद्वारे मदत कार्य करत आहोत .देशाच्या कानाकोपऱ्यात समाजातील होतकरू बालगोपाल हे अनाथ आश्रमात शिक्षण घेत असतात. हे सर्व समाजातील भावी शिलेदारांची पिढी शिक्षण,अन्न वस्त्र निवारा, आरोग्याच्या सेवेपासून वंचित राहू नये म्हणून मायेची सावली महाराष्ट्र राज्य आज पुणतांबा येथे हा कार्यक्रम घेत आहे हा 35 वा मदत कार्यक्रम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.पुणतांबा शहर शिवसेनेच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे शाल देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आश्रमातील बालगोपालांनी मोठ्या उत्साहात उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.यावेळी खा वाकचौरे यांचा सत्कार शहर शिवसेना महेश कुलकर्णी.मायेची सावली यशवंत खोपकर.तसेच मेथडिस्ट चर्च जॉन पिटर सर.संजय पारधे सर. रुरल हायस्कूल माजी मुख्याध्यापक अशोक ओहळ सर यांच्या वतीने करण्यात आला .
याप्रसंगी यशवंत खोपकर.संदिप चांदिवडे.दौलत बेल्हेकर.वसंत घडशी, विश्वनाथ जाधव, वैभव डोके,राजेंद्र पेडणेकर, राजेंद्र मणसुख,दत्तात्रय काशिद, सचिन धनवटे,ॲड समुवेल पारधे,सुनिल ओहळ सर रुरल हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक अशोक ओहळ,विजय चांदेकर सर,वाल्मिक कुलकर्णी, बाळासाहेब पवार,एकनाथ कहाडंळ, विशाल कचरे,सतिश काळण,दिलीप कांबळे, बिट्टयु त्रिभुवन,सुदय क्षिरसागर, सुमित गायकवाड,सिरियल वाघमारे,यश डेंगिया,सागर ओहळ,मेघा सावंत,रुपाली डोके,निर्मला आवटे,अपुर्वा पारकर, चित्रा कुलकर्णी,नेहा कुलकर्णी,अर्णव सावंत, अर्णव खोपकर, लिखित डोके,उत्कर्ष कुलकर्णी, यांचेसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन संजय पारधे सर यांनी केले.