*पोपट फुलारी यांचे निधन*
भेंडा(वार्ताहर):— भेंडा येथे भेंडा-कुकाणा
रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झालेले पोपट शंकर फुलारी (वय ६२ वर्ष) यांचे पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की
दि.३० मार्च रोजी पाडव्याचे दिवशी रात्री साडेसात ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान
पोपट फुलारी हे रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून भरता वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिलयाने झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. सदर वाहन धडक देवून पसार झाले.
या अपघातात फुलारी यांच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव झाल्याने नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात प्रथोमचार करून पुढील उपचारसाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी दि.३१ रोजी त्यांना नगरहुन पुणे येथील ससून हॉस्पिटल मध्ये हालवण्यात आले होते. तिथे त्यांच्या मेंदूची सक्रिय करण्यात आली. मात्र १२ ते १४ दिवसाच्या उपचारानतंर त्यांचे शनिवार दि.१२ एप्रिल रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास ससून हॉस्पीटल,पुणे येथे निधन झाले.शनिवारी संध्याकाळी ६ वाजता भेंडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना शेतकी विभागातील कर्मचारी विठ्ठल फुलारी यांचे ते बंधू तर स्टोअर विभागातील कर्मचारी शरद फुलारी यांचे ते वडील होत.