डॉ. बाबासाहेब पवार अध्यक्ष तर डॉ. रघुनाथ नजन सरचिटणीस
दै.नगरशाही भेंडा(वार्ताहर):– नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रमेश नवल यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठिय व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या (स्पुक्टो) उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठिय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना(स्पुक्टो) अहिल्यानगर जिल्हा संघटनेची जिल्हा कार्यकारिणीची सभा रविवार दि.६ एप्रिल रोजी राधाबाई काळे महिला महाविद्यालय तारकपूर, अहिल्यानगर येथे पार पाडली.या सभेत संघटनेच्या वार्षिक अहवाल त्याच बरोबर संघटनेच्या कामकाजाचा आढावा यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संघटनेची पुढील दोन वर्षासाठी नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी निवड प्रक्रिया पार पडली.
स्पुक्टो अध्यक्ष डॉ. के.एल गिरामकर , सरचिटणीस डॉ.व्ही. एम.शिंदे हे उपस्थित होते. महाराष्ट्र प्राध्यपक महासंघाचे अध्यक्ष डॉ. एस.पी. लवांडे व
निवृत्त प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष
प्रा म.न. ताटे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.माजी जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश वाळुंज, प्रा. प्रदीप मुटकुळे, प्रा. संदीप पालवे, डॉ. भाऊसाहेब पवार,डॉ. बाबासाहेब गव्हाणे आदी स्पुक्टोचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
*डॉ. एस पी लवांडे…
बदलत्या काळातील उच्च शिक्षण क्षेत्रासमोरील वाढती आव्हाने,वाढत्या खाजगी करणाचा उच्च शिक्षणावर होणारा परिणाम,यासह व्यापक विद्यार्थी व समाज हितासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने व एकजुटीने काम करावे अशी अपेक्षा डॉ. एस पी लवांडे यांनी व्यक्त केली.
*बिनविरोध निवड झालेले पदाधिकारी असे…
अध्यक्ष- डॉ. बाबासाहेब पवार (बेलापूर महाविद्यालय),सरचिटणीस- डॉ रघुनाथ नजन (पारनेर महाविद्यालय),
उपाध्यक्ष डॉ. रमेश नवल (जिजामाता महाविद्यालय भेंडे) व डॉ.राजेंद्र वामन (संगमनेर नगरपालिका महाविद्यालय),
सहसचिव- डॉ.अविनाश फलके (जामखेड महाविद्यालय) व डॉ.भागवत परकाळ (अहमदनगर महाविद्यालय)
खजिनदार-डॉ.प्रतिक नागवडे (आनंद महाविद्यालय पाथर्डी), अंतर्गत हिशोब तपासनीस-डॉ. मनोहर सूर्यवंशी (श्री छत्रपती महाविद्यालय,श्रीगोंदा),
स्पुक्टो प्रतिनिधी-डॉ.सतिश सायकर (राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहिल्या नगर).