पाणी वापर संस्थांचे कामकाजात सुधारणा न झाल्यास बरखास्त करा – जनसंसद
भेंडा – वृत्तसेवा
मुळा पाटबंधारे अंतर्गत असणाऱ्या अनेक पाणीवापर संस्थांचे काम असमाधानकारक व शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असून त्यात तातडीने सुधारणा न झाल्यास अशा सर्वच सहकारी संस्था बरखास्त कराव्यात, अशी मागणी भारतीय जनसंसदने मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांचेकडे केली आहे.
मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांना लिहिलेल्या पत्रात भारतीय जन संसदचे तालुकाध्यक्ष रामराव भदगले, शिवाजीराव फाटके, कारभारी गरड, प्रा.नानासाहेब खराडे, डा.करणसिह घुले, अड. जानकीराम डवले, सुरज खैरे, बाबासाहेब भागवत आदीनी म्हटले आहे की ,पाणी वापर संस्थांच्या कामकाजात दोन वर्षापासून मागणी करून ही सुधारणा होत नाही, अनेक संस्थांचे अभिलेख अद्यावत नाही, सुमारे 50 टक्के संस्थांनी लेखापरीक्षण केलेले नाही, वसूल केलेले पैसे खात्यात न भरणे, सभासद नोंदणी नसणे, अधीक्षक अभियंता यांनी आदेश देऊनही पाणी वापर संस्थांची चौकशी न करणे, सचिव व अध्यक्ष यांच्या संगनमताने आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता करणे आदी गैरप्रकार सर्रास होत आहेत.
——————————————————-
पाणी वापर संस्थेची तक्रार मानवी हक्क आयोगाकडे –
निवेदन वाचताना तहसीलदार यांनीच मानवी हक्क आयोगाकडे भाऊसाहेब उभेदळ ( रा.नांदूर शिकारी ) या शेतकऱ्याने पाणी वापर संस्थे विरोधात तक्रार केल्याचे सांगितले. यावरून भारतीय जनसंसद च्या मागणीत तथ्य असल्याचे दिसून येते.
———————————————————-
फोटोओळी
भेंडा – पाणी वापर संस्थाचे निवेदन तहसीलदार यांना देताना नेवासा तालुका भारतीय जनसंसदचे कार्यकर्ते.