दै.नगरशाही भेंडा प्रतिनिधी-
लोकनेते मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलीत जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना निरोप समारंभ उत्साहात पार पडला .याप्रसंगी व्यासपीठावर प्रा.डॉ .राजेंद्र गवळी ,उपप्राचार्य दीपक राऊत ,देशमुख गिंताजली, गुळमकर सोनाली ,राणी स्वामी, शिलागिरी कुमार ,उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावी तशी मूर्ती घडते, लहान मुलांमध्ये शिक्षणामध्ये आवड निर्माण करण्यासाठी व शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणे फार महत्त्वाचे आहे .त्यासाठी विद्यार्थ्यांना अभिरुची निर्माण करून शिक्षणात गोडी निर्माण करणे हे आपले कर्तव्य समजतो असे प्रतिपादन डॉ.राजेंद्र गवळी केले.
यावेळी सुरेखा राऊत यांनी आपले मनोगतात म्हणतात की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे, यादरम्यान शाळेतील विविध स्पर्धाच्या माध्यमातून क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये वाघमारे स्वरा, घोरपडे दक्ष, कानडे विना, घुमरे शिवज्ञा, शिंदे पूर्वी, ठोंबरे युवराज, निकम वरद, देशमुख वसुंधरा, लोखंडे आलोक, राज भोसले श्रेया, गारुडे स्वरा, पठाण झेद, कुरुंद शौर्य, मिसाळ तेजल, निकम विराज, सामोरे नित्या, आरगडे कार्तिकी, गव्हाणे सिद्धार्थ, शेळके श्रावणी, नवगिरे अभिज्ञा, लवांडे स्वरूप, पिंपळे अविरा, पाखरे शुभ्रा, बावधनकर अवनीश तसेच यावेळी शिवाज्ञा घुमरे या विद्यार्थिनीने बनवलेल्या शाळेच्या प्रतिकृती ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य ,गाणी व कवितांचे तालासुरात गायन केले. या सर्व विद्यार्थ्यांना तबस्सुम शेख, अर्चना मिसाळ ,अभंग आदिती ,सुरेखा राऊत या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमप्रसंगी टेकणे बापूसाहेब, प्रियंका वायकर, प्रवीण कोकरे, फुलारी कविता, अनिल शेळके, कलावती घोंगाने , रेखा कुलकर्णी रोहिणी कोलते, रावसाहेब आढागळे उपस्थित होते. सूत्रसंचालन के.जी शिक्षिकांनी केले तर तबसूम शेख यांनी आभार मानले.