*”सराईत गुन्हेगारांची टोळी हद्दपार”*
*”नेवासा पोलिसांची कामगिरी”*
नेवासा प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य सरकारने गो-हत्येस बंदी घालून देखील वारंवार गो-हत्या करणाऱ्या नेवासा येथील आठ सराईत गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दोन वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, नेवासा येथील 1. नदीम सत्तार चौधरी 2. फिरोज अन्सार देशमुख 3. शोएब अलीम खाटीक 4. अबू शाबुद्दीन चौधरी 5. मोजी अबू चौधरी 6. जबी लतीफ चौधरी 7. अन्सार सत्तार चौधरी 8. अकील जाफर चौधरी सर्व रा. नायकोडी मोहल्ला ता. नेवासा यांना अहिल्यानगर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीतून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेले आहे.
टोळी प्रमुख नदीम चौधरी व त्याचे
नेवासा शहर व परिसरात गोवंशिय जनावरांची कत्तलीसाठी तस्करी करणे, गोवंशिय जनावरांना अमानुषपणे वागणूक देऊन त्यांना चारा पाण्या वाचून डांबून ठेवणे, त्यांची कत्तल करणे, धार्मिक भावना दुखावणे, जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना वाहन भरधाव वेगाने चालवणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे अशा अपराधासाठी त्यांच्यावर पोलीस ठाणे नेवासा तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापे घालून अनेकदा गुन्हे दाखल करून कारवाई केलेली आहे. या बाबत नेवासा पोलिसांनी त्यांच्यावर अहिल्या नगर जिल्ह्यातून हद्दपार सारखी कठोर प्रतिबंधक कारवाई देखील केलेली होती. परंतु या हद्दपार आदेशास स्थगिती मिळवली होती. त्या नंतरही नदीम चौधरी व त्यांच्या टोळीतील सदस्यांच्या वर्तनात कोणताही फरक पडत नसल्याने सदर टोळीतील 9 सदस्यांना हद्दपार करण्यासाठी पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे नेवासा यांनी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांच्या मार्फतीने पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. सदरचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्वीकारून प्रस्तावित हद्दपार इसम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु प्रस्तावित हद्दपार इसम यांनी सदर कारणे दाखवा नोटीसला कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नसल्याने या टोळीतील सदस्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी काढलेला आहे. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी हद्दपारीचा आदेश केल्यानंतर वर नमूद सराईत गुन्हेगार यांना सदर आदेशाची बजावणी करण्यात आलेली आहे.
या आदेशानुसार हद्दपार इसमांनी हा आदेश मिळाल्यानंतर तात्काळ अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाहेर जायचे आहे. बाहेर गेल्यानंतर पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रात हद्दपारचा कालावधी संपेपर्यंत हद्दपार प्राधिकारी, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर किंवा महाराष्ट्र शासन यांच्या लेखी परवानगीशिवाय अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करायचा नाही. कोर्ट तारीख, मतदान अशा कामासाठी लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. हद्दपार टोळी अहिल्यानगर जिल्ह्यातून बाहेर गेल्यानंतर ज्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणच्या जवळच्या पोलीस स्टेशन येथे त्यांना कळवायचं आहे तसेच महिन्यातून किमान एकदा हजेरी लावायची आहे. टोळी सदस्याने हद्दपार कालावधीत राहत असलेल्या ठिकाणाहुन बाहेर गेल्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनला तात्काळ लेखी कळवायचं आहे. हद्दपार टोळीचे सदस्य यांना हद्दपार केल्यानंतर राहत असलेले ठिकाणी परत आल्यानंतर दहा दिवसाच्या आत लेखी कळवायचे आहे.
पोलीस ठाणे अभिलेखावरील आणखी काही सराईत गुन्हेगार हद्दपार आणि एम.पी.डी.ए. च्या लाईनमध्ये असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे. वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही याचा पुनरुच्चार केला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री. वैभव कल्लूबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव श्री. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जरे, पो. हवा. राम माळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा गरड यांनी केली आहे.