विविध शालेय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न..
कुकाणा ( प्रतिनिधी )- विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास करत असताना त्यांना शिक्षणा बरोबर योग्य संस्कार मिळाल्यास येणाऱ्या काळातील पुढील पिढी सुद्धा सुसंस्कारी होईल व देशाचे चांगले नागरिक बनतील,जी स्टार प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लास व जी स्टार क्लासेस विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन मार्गदर्शन करते हे कौतुकास्पद असून
अबॅकस म्हणजे आपल्या बुद्धीचा कस आहे असे प्रतिपादन ॲड. हिम्मतसिंह देशमुख यांनी केले.
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात जी स्टार प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लास व जी स्टार क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने कुकाणा येथे MGO (Math genius olympiad) Nmms, अबॅकस, नवोदय, स्कॉलरशिप या विविध शालेय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळया प्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. व्यासपीठावर सरपंच लताताई अभंग, वैशाली देशमुख, राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुलभैया शेख , भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंपालाल बोरा, ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुनील पंडित विलासराव देशमुख ,पत्रकार सोमनाथ कचरे माजी उपसरपंच आत्माराम लोंढे, गोरक्षनाथ लोंढे हे प्रमुख अतिथी होते. क्लासेसच्या संचालिका मनीषा लोंढे यांनी प्रास्ताविक केले तर संचालक अध्यापक जयदीप लोंढे यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अर्पण करून अभिवादन केले. आली. यावेळी मान्यवरांसह जी स्टारचा सर्वेश सदावर्ते या विद्याथ्यांने आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितीतांचे लक्ष वेधले.यावेळी विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या एकुण १२८ विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्व्हर मेडल,सन्मान चिन्ह व कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरवडी येथील दीनमित्रकार माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या सहभागी शाळांना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी सुमनताई लोंढे, शिवाजी पवार संपत नाईक, भगवान कचरे,अमीर शेख, अमित गुगळे,सुमित बोरा, दिपाली सदावर्ते,चंद्रकला लोंढे विद्यार्थी पालक व तरवडी कुकाणा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अध्यापक गणेश घुले यांनी केले तर सचिन लोंढे यांनी आभार मानले .