15.5 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

जागतिक महिला दिनानिमित्त विश्वविनायक मल्टिटेटच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा गौरव

 

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा येथे जागतिक महिला दिनानिमित्त विश्वविनायक मल्टिटेटच्या नेवासा शाखेच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा श्री विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती भेट देऊन सत्काराद्वारे गौरव करण्यात आला.विश्व विनायक मल्टीटेटचे संस्थापक अध्यक्ष मोदक शहाणे यांच्या प्रेरणेने मार्गदर्शक प्रमोद पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तृत्ववान स्त्री शक्ती गौरव सोहळयाचा उपक्रम राबविण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नेवासा येथील मुख्य पेठेत डॉ.हेडगेवार चौकात असलेल्या विश्व विनायक मल्टीटेटच्या नेवासा शाखेच्या वतीने आयोजित गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी आई तुळजाभवानी,राजमाता जिजाऊ माँ साहेब,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती  शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सुवासीनींच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित महिलांनी गायलेल्या “इतनी शक्ती हमे देना दाता,मन का विश्वास कमजोर हो ना”या  सामूहिक गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी विश्वविनायक मल्टीटेटच्या नेवासा शाखेच्या मॅनेजर जयश्री दारुंटे यांनी आलेल्या कर्तृत्ववान महिलांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोदक शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून स्त्री शक्तीच्या उद्धारासाठी विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस पाटील अँड.स्मिताताई लवांडे,सौ. कल्पना पोतदार(महिला वस्त्रोद्योग)जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ.समदा ससे,शिक्षिका सुवर्णा भांड,अंगणवाडी सेविका सौ०सुवर्णा गायकवाड, सौ. उज्वलाताई कडू,सौ.संगिता चव्हाण(धर्म कार्य), सौ. दीपाली औटी(फेटा व्यवसाय),सौ.योगिता बागडे (ब्युटीशीयन),संध्या राहुरकर(आशा स्वयंसेविका)श्रीमती शुभांगी पोतदार(सराफी व्यवसाय)यांचा फेटा,विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती गुलाबपुष्प,प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.ठेवीदार पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर विश्वविनायक मल्टीटेटचे सह- व्यवस्थापक सौरभ दुधे यांनी उपस्थित कर्तृत्ववान महिला भगिनींचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या