*चुकीची मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबणाची मागणी* दै.नगरशाही
(नेवासा प्रतिनिधी) :- मुकिंदपूर हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या चारिवरील अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या चुकीच्या मोजणी विरोधात आज काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येथील व्यापाऱ्यांनी आज भूमीअभिलेख कार्यालयावर मोर्चा काढत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
सविस्तर वृत्त असे की, मुकिंदपूर हद्दीतून डीवाय तीन पासून पावन गणपती पर्यंत सबमायनर दोन ही पोटचारी जाते.गेल्या वीस वर्षांपासून ही चारी बंद अवस्थेत असल्यामुळे या चारिवर स्थानिक लोकांकडून अतिक्रमण झाले. हे अतिक्रमण काढण्याची मागणी झाल्यामुळे पाटबंधारे विभागाकडून या चारीवरील अतिक्रमण काढण्यासाठी हालचालीस जोरात सुरुवात करण्यात आली. भूमी अभिलेख कार्यालयाकडून या चारीची हद्द मोजणीची प्रक्रिया सुरुवात करण्यात आली. परंतु ही मोजणी करताना मूळ अधिग्रहण केलेल्या नकाशानुसार न करता मूळ चारीची हद्द बदलून करण्यात आली त्यामुळे याअगोदर करण्यात आलेल्या मोजणी पेक्षा वेगळी मार्किंग करण्यात आली त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांना या अतिक्रमनात ओढण्यात आले. त्यामुळे येथील व्यापारी वर्गात मोठा असंतोष निर्माण झाला. चुकीच्या केलेल्या मोजणीच्या विरोधात भूमी अभिलेख अधिकाऱ्याच्या विरोधात सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत नेवासा काँग्रेसचे अंजुम पटेल, प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा फाटा येथील भूमीअभिलेख कार्यालयावर धडक मोर्चा काढला व दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयच्या कारभारावर आक्षेप घेत आर्थिक तडजोडी करून ह्या चुकीच्या मोजणीचा घाट घालण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी काँग्रेस पक्ष हा व्यापाऱ्यांनाच्या पाठीशी ठाम उभा असून एकाही व्यापाऱ्यां वर अन्याय होऊ देणार नाही असे स्पष्ट केले. अंजुम पटेल यांनी चुकीची मोजणी करण्यामागे आर्थिक तडजोड हेच कारण असून चुकीची मोजणी करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी याना निलंबित केलेच पाहिजे या भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकविणार. तर महिला काँग्रेसच्या शोभा पातारे यांनी सरकारला धारेवर धरत निवडणुकीत यांना मतदान केल्याचे हे बक्षीस व्यापाऱ्यांना या सरकारने दिले आहे हेच भाजपने दिलेले अच्छे दिन आहेत असा घनाघात केला.
यावेळी पाटबंधारेचे उपभियंता अक्षय कराळे व भूमी अभिलेख अधिकारी यांनी उपस्थित आंदोलनास संबोधित करत नव्याने मोजणी करून नियमामधेच मार्किंग केली जाईल व कुठल्याही प्रकारे नियमबाह्य अतिक्रमण काढले जाणार नाही याची हमी दिली. यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.यावेळी जिल्हा काँग्रेसचे संदीप मोटे,आपचे प्रवीण तिरोडकर, आयन पिंजारी, बादल परदेशीं, सचिन गायकवाड, हरी दुकळे, भैय्या पटेल, शरीफ शेख, गुलाब पठाण, संतोष ससाणे, विकास गवळी, महादेव नंनवरे, जब्बर शेख, शाहरुख कुरेशी, सादिक शेख आदी सह असंख्य व्यापारी उपस्थित होते.