नेवासा(प्रतिनिधी)श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराजांनी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात देवस्थानचे विश्वस्त हभप देविदास महाराज म्हस्के यांच्या संकल्पने सुरू करण्यात आलेल्या गोशाळेची नुकतीच पहाणी करून समाधान व्यक्त केले.
अचानकपणे दिलेल्या भेटीप्रसंगी गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांनी वैकुठंवाशी गुरुवर्य श्री बन्सी महाराज तांबे समाधी मंदिर,संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पैस खांबसह भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले.यावेळी देवस्थानच्या वतीने विश्वस्त वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के यांनी त्यांचे संतपूजन केले.