*हरवलेले तीन तोळे पोलिसांनी केले परत*
*हरवलेले तीन तोळे सोने पोलिसांनी केले परत*
*दोन लाखाचे सोन्याचे दागिने केले परत*
नेवासा प्रतिनिधी :17 फेब्रुवारी
हाकिकत अशी की, इंदुबाई शिवाजी गुजर वय 42 वर्ष रा. भातकुडगाव ता. नेवासा या 12 फेब्रुवारी रोजी आपले पती शिवाजी गुजर यांचेसह कारने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकास भेटण्यासाठी श्रीरामपूर येथे चालले होते. नेवाशात आल्यानंतर सीएनजी पंपावर गॅस भरून श्रीरामपूरला गेले, श्रीरामपूरमध्ये पोहोचल्यानंतर मांडीवर असलेले सोन्याचे तीन तोळ्याचे दागिने नसल्याचे लक्षात आले.
पती-पत्नी तातडीने वाऱ्याच्या वेगाने नेवासा येथे सीएनजी पंपावर परत आले. परंतु तेथे हरवलेले सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. त्यानंतर इंदुबाई यांनी तडक नेवासा पोलीस स्टेशन गाठले तेथे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना तीन तोळ्याचे सोन्याच्या दागिने हरवल्याची कैफियत सांगितली. त्यानंतर तीन तोळे सोन्याचे दागिने हरवल्या बाबत पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून नेवासा पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार अजय साठे यांच्याकडे तपास देण्यात आला होता. तसेच नेवासा पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाकडे देखील याची कामगिरी सोपवली होती.
नेवासा पोलीस ठाण्याच्या डीबी पथक मधील पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस नाईक गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल साळवे, नारायण डमाळे, आप्पा तांबे यांनी सीएनजी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासून ज्यांना सापडले त्यांच्याकडून सदरचे २ दोन लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत करून तक्रारदार यांना रीतसर परत केले. तक्रारदार यांनी नेवासा पोलिसांचे आनंदाने आभार मानले.