26.2 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

*”सौंदाळा प्रकरणी शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्याने गुन्हा नोंद”*

*”शासकीय कामकाजात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल”*

 

दै.नगरशाही नेवासा: प्रतिनिधी : 15 फेब्रुवारी

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीची विश्वविंड ते भेंडा 32 केव्ही इलेक्ट्रिक लाईनचे कामकाज खाजगी ठेकेदाराच्या वतीने मागील चार वर्षापासून चालू आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान भरपाईचे मोजमाप करून त्याची किंमत निश्चित करून बहुतांशी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील दिलेली आहे. परंतु सौंदाळा तालुका नेवासा येथील संजय रामहरी ठुबे व बंडू रामहरी ठुबे हे शेतकरी आम्हास समृद्धी महामार्गाच्या पाचपट दराने नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागील तीन ते चार वर्षापासून कोणत्याही न्यायालयाचा, प्राधिकरणाचा स्थगन किंवा मनाई आदेश हुकुम नसताना देखील वारंवार वेगवेगळ्या प्रकारे इलेक्ट्रिक लाईन टाकण्याच्या टॉवर उभारणी कामकाजात अडथळा व्यत्यय आणि हरकत करीत आहेत म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने पोलीस बंदोबस्त घेऊन कामकाज सुरू आहे. संजय रामहरी ठुबे यांनी मागील तीन ते चार वर्षात माझ्या शेतात टॉवर उभारणीचे कामकाज सुरू केले तर मी आत्मदहन करतो अशा प्रकारच्या वारंवार धमक्या, भीती प्रशासनास देऊन तसेच माझे प्रकरण न्यायालयात आहे, हायकोर्टात आहे अशी वेगवेगळी कारणे सांगून वारंवार कामकाज बंद पाडले आहे होते.

काल शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी बंडू रामहरी ठुबे यांच्या मालकीच्या शेतात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने बंदोबस्त घेऊन इलेक्ट्रिक लाईनचा मनोरा उभारण्याकरता पोलीस बंदोबस्तात कामकाज सुरू असताना संजय रामहरी ठुबे व बंडू रामहरी ठुबे यांच्या कुटुंबातील 1.बाळासाहेब रामहरी ठुबे 2.आदित्य बंडू ठुबे 3.रमेश बाळासाहेब ठुबे 4.महेश बंडू ठुबे 5.भीमाताई रामहरी ठुबे 6.चंद्रकला राम हरी ठुबे व ईतर तीन ते चार महिला यांनी सर्व रा. सौंदाळा ता. नेवासा या व्यक्तीनी येऊन मनोरा उभारणीच्या कामकाजासाठी आणलेल्या मशिनरीच्या पुढे आडवे येऊन कामकाज बंद पाडले त्यावेळी पोलिसांनी 1. बाळासाहेब रामहरी ठुबे 2. रमेश बाळासाहेब ठुबे 3. आदित्य बंडू ठुबे या तिघांना तात्काळ ताब्यात घेऊन आकाश शंकर हुच्चे वय 31 वर्ष, सहाय्यक अभियंता, बाबळेश्वर, ता. राहता.यांच्या फिर्यादीवरून 1.बाळासाहेब रामहरी ठुबे 2.आदित्य बंडू ठुबे 3.रमेश बाळासाहेब ठुबे 4.महेश बंडू ठुबे 5.भीमाबाई रामहरी ठुबे 6.चंद्रकला राम हरी ठुबे यांच्या विरुद्ध गैर कायद्याची मंडळी जमवणे, शासकीय कामकाज आडकाठी करणे, शासकीय नोकरांना धक्काबुक्की करणे, मागण्या गैरमार्गाने पूर्ण करण्यासाठी जीव देण्याची धमकी देणे व प्रयत्न करणे, शासकीय कामकाज अडथळा आणणे, आत्मदान करण्याची भीती घालणे ईत्यादी अपराधाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तसेच संजय रामहरी ठुबे यांनी गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाणे येथे येऊन पोलीस निरीक्षक, नेवासा पोलीस ठाणे यांना निवेदन दिले की आमच्या शेतामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीत जर कामकाज सुरू केले तर मी कोठेही केव्हाही आत्मदहन करेल म्हणून नेवासा पोलिसांनी संजय रामहरी ठुबे यांना भारतीय न्याय संहिता कलम 170 अन्वये 24 तास डिटेन केले होते. त्यानंतर त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी श्रीरामपूर यांच्या समक्ष चांगल्या वर्तणुकीचा मुचलका घेण्यासाठी हजर करण्यात आले आहे.

या प्रकरणी शासनाच्या लोकहिताच्या या योजनेस अद्याप पर्यंत कोणत्याही न्यायालयाचा किंवा प्राधिकरणाचा मनाई सलगन स्थगित हुकूम आदेश नाही हे विशेष आहे.

शासनाच्या लोकहिताच्या योजनांच्या आड विनाकारण कोणीही येऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव पोलीस ठाणे नेवासा यांनी केले आहे.

सोबत:- फोटो

Related Articles

ताज्या बातम्या