* 11 मीटरपेक्षा जास्त अतिक्रमण काढण्यापूर्वी अवार्ड ( मोबदला) मिळावा
दै.नगरशाही
नेवासा प्रतिनिधी: कुकाणा येथील व्यापारी राज्य मार्ग रुंदीकरण दहा मिटर पेक्षा अंतर कमी करणेबाबत राष्ट्रवादी चे मा.आमदार पांडुरंग अभंग यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अधिकारी यांना कुकाणा,भेंडा येथील व्यापारी यांनी स्वत: नालिपर्येंत अतिक्रमण काढून घेतले आहे. पुढील अतिक्रमण काढण्यासाठी जमिन अधिग्रहण करून ,त्याचा अवार्ड ( मोबदला ) मिळणे आवश्यक आहे.अन्यथा नालीपुढील अतिक्रमण काढण्यास कुकाणा ग्रामपंचायत व व्यापारी यांचा विरोध असेल.व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले आहे, .नेवाशाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव साहेब यांच्या शी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून ट्रेफिकची समस्या सोडवू असे सांगितले.
सदर व्यापारी यांना दिलेली नोटीस ही शासकीय जागेतील राज्य मार्गावर असलेली जागेसाठी आहे,
त्यामुळे प्रशासकीय अधिकारी यांनी देखील फक्तं शासकीय जी.आर.चा फार्स करू नये, अवॉर्ड (मोबदला) न देता अधिकारी यांना 11 मीटरपेक्षा जास्त अतिक्रमण काढू दिले जाणार नाही. कुकाणा ग्रामपंचायत व्यापारी यांच्या सोबत
असल्याचे मा.आ.अभंग यांनी स्पष्ट केले.त्यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
शासनाने गोरगरीब सामान्य व्यापारी यांचा सहानुभूती पूर्वक विचार करुन अंतराची अट शिथील करावी .11 मीटर पेक्षा जास्त अतिक्रमण काढल्यास अनेकांचे संसार रस्तावर येतील: व्यापारी शरद गरड