25.5 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

कुकाणा येथील व्यापारी यांचा अब्दुल भैय्या शेख यांचे नेतृवात जिल्हाधिकारी व नायब तहसिलदार यांना निवेदन*

दै.नगरशाही
नेवासा प्रतिनिधी : कुकाणा येथील व्यापारी राज्य मार्ग रुंदीकरण दहा मिटर पेक्षा अंतर कमी करणेबाबत राष्ट्रवादी चे नेवासा युवा नेते अब्दुल भैय्या शेख यांचे नेतृत्वात  जिल्हाधिकारी सिद्धिराम सालिमठ यांना निवेदन देण्यात आले.त्यापूर्वी कुकाणा, भेंडा , व्यापारी नेतृत्वात मुक मोर्चा नेवासा तहसिल कार्यालय पर्यंत काढण्यात आला .कुकाणा येथील अंतराचा खुलासा कारणे, दहा मिटर चे अंतर कमी करणे, अतिक्रमनातून निघालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करणेबाबत नेवासा नायब तहसिलदार सानप यांचे सोबत चर्चा करण्यात आली.

पंधरा मीटर मधील अतिक्रमण ऐवजी दहा मीटर पर्यंत अतिक्रमण काढावे. नायब तहसीलदार सानप यांचे बरोबर युवा नेते अब्दुल भैय्या शेख आणि व्यापारी यांनी चर्चा केली.
हजारो कुटुंबाची गुजराण या रस्त्यालागत असणाऱ्या दुकानावर अबलंबून आहे. कित्येक वर्षांपासून दुकानदार यांची उपजीविका गुजराण याच व्यवसायावर अवलंबून आहे. उपजीविका करण्यासाठी दुसरे साधन नाही. मुलांचे संगोपन, शिक्षण, लग्न आदी. दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नावर हजारो कुटुंबातील लोकांची उपजीविका अवलंबून आहे.
सदरील व्यापारी यांनी स्वतःहून रोड लगत असणाऱ्या दोन्ही बाजूला साईड गटार च्या बाहेर अतिक्रमण केले आहे. दोन तीन वर्षांपूर्वी अतिक्रमण होऊ नये म्हणून ही साईड गटार बनवण्यात आली होती. तेथील अतिक्रमण दुकानदार यांनी स्वतःहून काढून घेतले आहे.

तरी दुकानदार आणि त्यांचे कुटुंब यांचा विचार करून योग्य ते कारवाई व्हावी व अतिक्रमण करणारे व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा.
भेंडा कुकाणा येथील साईड गटार बाहेर असणारे व्यापारी दुकान अतिक्रमण चौपदरी रस्ता मंजुरी येऊ पर्यंत राहू द्यावे. सुमारे हजार ते बाराशे व्यापारी आणि त्यांचे कुटुंब उपजीविका करिता या दुकानावर अवलंबून आहे. भेंडा येथील दुकानदार विस ते पंचवीस गावे आणि कुकाणा बाजारपेठ येथे देखील वीस ते पंचवीस गावांची बाजारपेठ या महत्वाच्या भेंडा आणि कुकाणा येथील व्यापाऱ्यांवर दैनिक गरजा भागणारे व्यवसाय आहे.

दुकानदार यांचे कायम स्वरूपी पुनर्वसन करावे अशी जिल्हा अधिकारी साहेब ,महाराष्ट्र शासन आणि प्रशासन ला मागणी. आमच्या विनंतीचा मागणीचा विचार न झाल्यास नाईलाजास्तव आम्हांला आंदोलन करावे लागतील. यास सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन राहील,अशी व्यापारी यांनी घेतली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या