अतिक्रमणधारकांना कुकाणा, नेवासा फाटा येथील व्यापाऱ्यांची प्रशासनाला साथ पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या मार्फत आ.लंघे पाठपुरावा करणार
दै.नगरशाही न्यूज नेटवर्क
नेवासा प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागाने नेवासा, नेवासा फाटा, भानसहिवरा, सौंदाळा, भेंडा, कुकाणा, चिलेखनवाडी येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. कारवाई सुरू झाल्यानंतर बहुतांशी अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविली. दरम्यान, राज्यमार्ग क्रमांक ५० च्या दुतर्फा असलेली दोन्ही बाजूंची अतिक्रमणे हटविण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी पोलिस बंदोबस्ताची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.
- आज व्यापारी यांनी आमदार विठ्ठलराव लंघे, शिवसेना नेते प्रभाकर शिंदे यांना भेटून निवेदन दिले. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद आरगडे,विलास देशमुख,देविदास गरड,जावेद शेख ,समीर पठाण,सोमनाथ कचरे,गणेश फासे,संजय भंडारी आदि,व्यापारी प्रतिनिधी मंडळाने 15 मीटर अट कमी करण्याची विनंती केली .तसेच जेंव्हा प्रत्येकक्षात काम सुरू होईल तेव्हा सरकारी नियमाप्रमाणे अतिक्रमण काढण्यार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आमदार लंघे यांनी आपण स्वतः यासंदर्भात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेऊन , व्यापारी यांचे निवेदन देणार असल्याचे सांगितले.तसेच मा.ना.मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना दौलतराव देशमुख ,बाळासाहेब कचरे देखील व्यापाऱ्यांना घेऊन निवेदन देण्यात येणार आहे.
नेवासा फाटा, भेंडा बुद्रुक येथील अतिक्रमण धारकांना मागील महिन्यात नोटिसा बजावल्या होत्या. शुक्रवारी कुकाणा येथील राहिलेल्या अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे. भेंडा बुद्रुक,नेवासा, कुकाणा येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने आखून दिलेल्या नालीवरील येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने आखून दिलेल्या नालीवरील अतिक्रमण स्वतः काढले आहेत.
नेवासा शेवगाव मार्गावर अनेक व्यापारी हे सर्व सामान्य असून गोरगरीब व्यापारी रस्तावर येतील,त्यामुळे सहानुभूती पूर्वक शासनाने विचार करावा.आज 4 वाजेपर्यंत सर्वांनी कुकाणा रोडवर नालीपर्यंत अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन व्यापारी संघटनेने केले आहे: