दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी:समीर शेख
आष्टेडू आखाडा फेडरेशन ऑफ भारत मर्दानी खेळ,19 वी राष्ट्रीय ज्युनियर व सिनियर लेव्हल-आष्टेडू आखाडा चॅम्पियन 2024-25 स्पर्धा,वसंतराव नाईक सरकारी कॉलेज नागपूर व महाराष्ट्र राज्य आष्टेडू आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 01 ते 03 फेब्रुवारी दरम्यान वसंतराव नाईक सरकारी कॉलेज, नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या.
सदर स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित,तेलकूडगाव येथील घाडगे पाटील माध्यमिक विद्यालयातील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत नेहमीप्रमाणे उत्तम यश प्राप्त केले.
. या स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटात हस्तकलेमध्ये जयदीप शिंदे याने सिल्वर मेडल तसेच 17 वर्ष वयोगटात करण खोमणे,आदित्य घिगे व पार्थ घोरपडे यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले.17 वर्ष वयोगटात स्पेअर बॅलेंसिंग मध्ये आदित्य वजीर याने गोल्ड मेडल पटकावले. शिव कलेमध्ये गौरव तांगडे याने गोल्ड मेडल पटकावले तर 19 वर्षे वयोगटात हस्तकलेमध्ये ओम डांगे याने
गोल्ड मेडल पटकावले.
विद्यालयातील मुलींनीही आपल्या उत्कृष्ट कौशल्याचा प्रदर्शन करत यश प्राप्त केले त्यामध्ये 14 वर्ष वयोगटात हस्तकलेमध्ये श्रद्धा साखरे हिने सिल्वर मेडल तर 17 वर्ष वयोगटात शिव कलेमध्ये आर्या वाघमारे हिने गोल्ड मेडल पटकावले तसेच स्पेअर बॅलेंसिंग मध्ये फिरदोस शेख हिने गोल्ड मेडल, हस्तकलेमध्ये आरती गागरे व साक्षी तांदळे यांनीही गोल्ड मेडल प्राप्त केले. तैवान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. वरील सर्व खेळाडूंना मास्टर अनिल मिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील, अध्यक्षा सुमतीताई घाडगेपाटील, उपाध्यक्षा स्नेहल चव्हाण,सचिव मनिष घाडगे,प्रशासक मनिषा राऊत,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे यांनी अभिनंदन केले.