. दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी :
लोकनेते मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था ,भेंडा येथील जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ पार पडला. लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी काळाची पावले ओळखून परिसरातील शेतकरी, कष्टकरी, घटकांच्या उन्नतीसाठी दर्जेदार पूर्ण शिक्षण दालन खुले केले. घुले पाटील शिक्षण संस्थेत शिकलेले विद्यार्थी देश विदेशात सेवा करत आहेत .या संस्थेत कृतीशील व सर्जनशील विद्यार्थी घडतात .असे प्रतिपादन रामेश्वर महाराज कंठाळे यांनी केले. नेवासा तालुक्यात भेंडा या ठिकाणी जिजामाता पब्लिक स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप संभारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेची प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे प्रा.डॉ.राजेंद्र गवळी उपप्राचार्य दीपक राऊत ,व कृष्णा आरगडे उपस्थित होते.
यावेळी प्रशासकिय अधिकारी प्रा.भारत वाबळे यांनी विद्यार्थ्यांनी आई-वडील व शिक्षक यांची आज्ञा आयुष्यभर पाळावी.पैसे खर्च करून घेतलेल्या डॉक्टर वकील यांच्या सल्ल्यातून तात्पुरता दिलासा भेटतो. पण शिक्षकांच्या मार्गदर्शनातून जीवन घडते. विद्यार्थ्यांनी सुशिक्षित होण्याबरोबर सुसंस्कृत व्हावे व सदाचारी व संतांची शिकवण आचरणात आणावी. यावेळी कु.प्रणाली होंडे व कु. खरड ओवी ,कु स्वरा शिंदे ,गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमादरम्यान कु. भक्ती दुकळे , नंदिनी मुंगसे,कु. सृष्टी आरगडे कु. श्रावणी मोटे कु. समृद्धी शिंदे, कु सारा पठाण या विद्यार्थ्यांनी, व रत्नमाला खराडे, प्रविण कोकरे या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.राजेंद्र गवळी , उपप्राचार्य दीपक राऊत , योगिता शेजुळ,रुपाली करबळकर,राणी स्वामी ,जयश्री थोरे उज्वला फंटागरे सुदीप खरात, सचिन गावडे , गणेश गव्हाणे, बापूसाहेब टेकणे, जयश्री उंडे, रेखा तरटे ,रुक्मिणी वेताळ,ताठे उषा, शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कु.अक्षरा मुरकुटे व कु. रिया गरड यांनी केले व सुकीर्ती हिवाळे हिने आभार मानले.