*”कत्तलीसाठीच्या गोवंशाची सुटका”*
दै.नगरशाही
नेवासा प्रतिनिधी:- दि. 31 जानेवारी 2025
सलाबतपुर शिवारात कत्तलीसाठी बांधून ठेवलेला 15 गोवंशीय जनावरांची नेवासा पोलिसांनी सुटका केलेली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार दि. 30 जानेवारी रोजी नेवासा पोलिसांना गोपनीय खबर मिळाली की, सलाबतपुर ता. नेवासा येथील बब्बू कुरेशी व शहानवाज कुरेशी यांचे घराचे पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ 15 गोवंशय जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवलेली आहेत. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिस पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस नाईक अरुण गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, अवि वैद्य, नारायण डमाळे यांनी गोपनीय मिळालेल्या बातमीनुसार सलाबतपुर परिसरामध्ये जाऊन छापा मारला असता त्या ठिकाणी बब्बू कुरेशी व शहानवाज कुरेशी याच्या घराच्या पाठीमागे तुकाराम पिसे यांच्या मालकीच्या पडीक शेतातील पाण्याच्या टाकीजवळ काटेरी झुडपामध्ये 90 हजार रुपये किमतीची 15 गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधल्याचे दिसून आले.
सदरची जनावरे दोन पंचांसमक्ष ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना खाजगी वाहनाने गोशाळा गोधेगाव तालुका नेवासा येथे दाखल केली आहेत.