अलअमीन उर्दू शाळेत विद्यार्थीनींनी गायलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली
नेवासा(प्रतिनिधी)नेवासा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य महंमदभाई आतार यांनी स्थापित केलेल्या अलअमीन उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थीनींनी गायलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलअमीन उर्दू हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष महंमदभाई आतार हे होते तर संस्थेचे सचीव मौलाना इबतेहाजोद्दिन काझी,मौलाना फजल, जेष्ठ कार्यकर्ते गफूरभाई बागवान,सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ केंदळे,संस्थेचे सहसचिव फारूकभाई आतार, संस्थेचे उपाध्यक्ष हाजी आजमखान पठाण,नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण,संस्थेचे संचालक हाजी सलीमभाई शेख,हाजी फारूक कुरेशी यावेळी मंचावर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक महंमदभाई आतार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजारोहण करण्यात आले.आलेल्या मान्यवरांसह पालकांचे उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक अन्सार पठाण यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.माजी जिल्हा परिषद सदस्य महंमदभाई आतार यांनी अलअमीन उर्दू हायस्कूलच्या १०० टक्के निकालाची परंपरा व वार्षिक उपक्रम याची माहिती आपल्या भाषणातून विषद करून शाळेच्या उन्नतीसाठी आपला प्रयत्न असल्याचे सांगितले.
या प्रसंगी उर्दू शाळेतील मुलींनी देशभक्तीपर सामूहिक गीते गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.यावेळी काही विद्यार्थ्यांनी देशभक्ती विषयक भाषणे सादर केली.
उर्दू हायस्कुल कमिटीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
या प्रसंगी उर्दू हायस्कूलचे शिक्षक जुनेद सर,निहाल सर,शिक्षिका अरिफा पठाण,रुबिना शेख यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते